Tarun Bharat

विजय – दिगंबरने पिंपळकटय़ावर केली प्रचाराची सांगता

प्रतिनिधी/ मडगाव

गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरेदसाई व काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत यांनी मडगावच्या पिंपळकटय़ावर श्री दामबाबाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराची सुरवात केली होती. काल त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुन्हा पिंपळकटय़ावर जाऊन दामबाबाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराची सांगता केली. यावेळी दोघांनीही आगामी सरकार हे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचे असेल असा दावा केला.

राज्यातील जनता भाजप सरकारला कंटाळली असून या सरकारला लोक घरी पाठवतील. संपूर्ण गोव्यात सरकार विरोधी लाट असून मतदार मतपेटीतून आपला राग व्यक्त करणार असल्याचे मत दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांनी गोव्याच्या हितासाठी एकत्र यावे अशी जनतेची इच्छा होती. त्या इच्छेनुसार दोन्ही पक्षात युती झाल्याचा दावा विजय सरदेसाई यांनी केला.

सरकारने अनेक घोटाळे केले. कोविडच्या काळात ऑक्सिनज आभावी लोकांचा बळी गेला, त्याला हे सरकार जबाबदार आहे. महागाई करून भाजप सरकारने गरीब जनतेवर वाईट परिस्थिती आणली. गरीब जनतेसाठी कोणतीच पॅकेज कोविडच्या काळात सरकारने दिली नाही. सरकार कुणाचे ऐकत नाही. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. ही धुंदी 10 मार्चला नक्कीच खाली उतरणार असल्याचे मत यावेळी दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

Related Stories

मनपा – मोन्सेरात पॅनलची उद्या घोषणा

Patil_p

नोकरभरती घोटाळ्यावरुन गदारोळ

Amit Kulkarni

28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

‘इफ्फीत’ तब्बल 280 चित्रपटांची पर्वणी

Amit Kulkarni

कदंबा महामंडळ घेणार 145 नवीन बस गाडय़ा

Amit Kulkarni

देवेंद्र फडणवीस, प्रतापसिंह राणे भेटीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Amit Kulkarni