Tarun Bharat

विजापुरात सात जण कोरोना पॉझिटिव्ह

वार्ताहर/ विजापूर

विजापुरात आज सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हय़ातील बाधितांची संख्या 68 वर गेली आहे. यातील पाच जण मुंबईहून विजापुरात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांनी दिली.

  तसेच आज सिव्हिल हॉस्पिटलमधून 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 41 झाली आहे. यामध्ये दोन महिला, एक पुरूष व एक मुलगी यांचा समावेश आहे. तसेच 16 जणांवर उपचार सुरू आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे.

  जिल्हय़ात आजपर्यंत विदेशातून 5073 जण आले आहेत. यापैकी 1705 जणांचे क्वारंटाईन अवधी संपला आहे तर 3327 जणून अजूनही क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 5595 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. 3324 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजून 2310 अहवाल येणे बाकी आहे.

  कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देताना डॉ. एस. ए. कट्टी, डॉ. लक्कणावर, डॉ. इंगळे, डॉ. ए. जी. बिरादार, डॉ. हळ्ळद, रवी कुचनाळ, वाय. व्ही. चुरी, आशा फरानकर, ए. के. मांडवी, बाळम्म कोटय़ाळ, ए. बी. साळुंखे, मंजू होसमनी, एस. एल. खाजापूर, जगदीश मानकर आदी उपस्थित होते.

Related Stories

चिकन पोहचलं 280 वर

Amit Kulkarni

गणित प्रश्नपत्रिकेची तक्रार थेट शिक्षणमंत्र्यांकडे

Amit Kulkarni

कोरोना बळींच्या संख्येनेही केली शंभरी पार

Patil_p

बिजगर्णी गावात भरविणार कुस्ती आखाडा

Amit Kulkarni

रविवारी 1331 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

मानधनाविना संपला ग्रा.पं.सदस्यांचा कार्यकाळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!