Tarun Bharat

विजापूर जिल्हय़ात 81 अहवाल निगेटिव्ह

पालकमंत्री शशिकला जोल्ले यांची माहिती : 75 अहवालाची प्रतीक्षा : जिल्हय़ात लॅब सुरू करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव

वार्ताहर/ विजापूर

जिल्हय़ातील दोन कुटुंबातील एकूण 6 जणांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच 162 स्वॅब टेस्टिंगला पाठविले होते. यापैकी 81 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 75 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.

  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाले, येथील जिल्हा प्रशासनाने उत्तम कार्य केले आहे. त्या दोन कुटुंबीयांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसराची बफर झोन म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या भागातील रहिवाशांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जात आहेत. तसेच आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी भीती न बाळगता आपले कार्य चालूच ठेवावे. सरकार आपल्या सुरक्षेची काळजी घेत आहे. तसेच त्यांना आरोग्य विम्याच्या व्याप्तीत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. जिल्हय़ात लॅब सुरू करण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे ठेवला आहे. याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे मंत्री जोल्ले यांनी सांगितले.

  तसेच त्या 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा महाराष्ट्रातील कांही लोकांशी संपर्क झाला आहे का असा संशय आहे. याबाबत पोलीस याची शहानिशा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच काल आढळलेल्या महिला कोरोना रुग्णाच्या पतीचे मध्यरात्री निधन झाले. त्याचा अंत्यविधी सरकारी नियमाप्रमाणे करण्यात आला.

Related Stories

झोपेतच पीएसआयचा हृदयविकाराने मृत्यू

Amit Kulkarni

आयसीएमआर इमारतीमध्ये होणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा

Patil_p

कंग्राळी बुद्रुकमध्ये जनावरांच्या गोठय़ाला आग

Amit Kulkarni

मुचंडी येथे मटकाबुकीला अटक

Tousif Mujawar

महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाचे दागिने चोरटय़ांनी भरदुपारी लांबविले

Amit Kulkarni

गायब झालेल्या असंख्य मालमत्तांची माहिती आता होणार उघड

Amit Kulkarni