Tarun Bharat

विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

कुर्डुवाडी/ प्रतिनिधी

पत्र्याचे शेडचे काम सुरु असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार झाला आहे. ही घटना शुक्रवारी दि.३१ रोजी दु. ३.३० वा कुर्डुवाडी – टेंभुर्णी रोडवरील पिंपळनेर गावात घडली. प्रवीण संतोष ढगे वय १४ वर्षे रा. पिंपळनेर ता. माढा असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत प्रमोद चंद्रकांत ढगे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत नोंद झाली आहे. ढगे यांच्या फिर्यादीवरुन याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीचे चुलत भाऊ रघुनाथ मारुती ढगे यांचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे पिंपळनेर गावात पत्र्याचे शेड चे काम चालू होते. मयत प्रवीण हा अधून मधून त्यांना मदत करण्यास जात होता. आज प्रवीण व मकरध्वज मारुती मोरे, व रघुनाथ ढगे, हे तिघे मिळून लोखंडी पाईप उभा करत असताना वरती असलेल्या मेनलाईनचा प्रवाह त्या पाईप मध्ये उतरला यावेळी रघुनाथ ढगे व मकरध्वज मोरे हे साईडला फेकले गेले. तर प्रवीणला विजेचा जोराचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला कुर्डुवाडी येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले असता तो उपचारापूर्वीच मरण पावला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

Related Stories

ग्रंथ हे जगण्याची भाकरी देतात

Patil_p

महाबळेश्वर शहर झाले कोरोना मुक्त

Patil_p

विकासकामांबाबत अजितदादा राजकारण करत नाहीत: आमदार शिवेंद्रराजे

Archana Banage

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत साताऱयाला 12 पदके

Patil_p

कोल्हापूर : तारदाळमध्ये युवकाची आत्महत्या

Archana Banage

भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाल्या…

Archana Banage