Tarun Bharat

विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

वार्ताहर/ एकंबे

भोसे, (ता.कोरेगाव) येथे ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त ग्राम प्रदक्षिणेसाठी मंगळवारी सकाळी निघालेल्या पालखी सोहळ्यादरम्यान देवाच्या मानाच्या सासनकाठीला महावितरण कंपनीच्या 11 के.व्ही. क्षमतेच्या वीज प्रवाह सुरु असलेल्या वहिनीचा शॉक बसल्याने काठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने वय 28 यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. ऐन यात्रेत सासनकाठीच्या मानकर्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास शोकाकूल वातावरणात महेश माने याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेनिमित्त सोमवारी धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी सकाळी देवाची पालखी व मानाची सासनकाठी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने यांनी काठीला एल. ई. डी. लाईटच्या सहाय्याने विशेष सजावट केली होती. ग्राम प्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर महेश माने यांनी ती नाचविण्यास सुरुवात केली. अचानक सासनकाठीचा महावितरण कंपनीच्या 11 के. व्ही. क्षमतेच्या वीज प्रवाह सुरु असलेल्या वाहिनीला धक्का लागला आणि वीज प्रवाह काठीत उतरल्याने महेश माने हे जागीच खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

 उपसरपंच अजित माने यांच्यासह ग्रामस्थ व युवकांनी तातडीने त्यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी रोहीत माने यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दुपारी महेश माने यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  ऐन यात्रेत सासनकाठीच्या मानकर्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.  

परिसरातून होतेय हळहळ व्यक्त

काठीचे मानकरी असलेल्या माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक होता, कोरेगावच्या डी. पी. भोसले कॉलेजमधून त्याने शास्त्र शाखेतून पदवीपूर्व शिक्षण घेतले आहे. वडील सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर शेती करत होते, काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. वडिलांनंतर शेतीची जबादारी महेश माने यांच्यावर येऊन पडली. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

एस. व्ही. आर. श्रीनिवास MMRDA आयुक्त; गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर

Tousif Mujawar

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत म्हणाले…

Archana Banage

नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल; तयारीला लागा

datta jadhav

बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही,महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका -शरद पवार

Archana Banage

शरद पवारांच्या आवाहानावर फडणवीस म्हणतात, मी दौरा सुरूच ठेवणार

Archana Banage

पाकिस्तानातील धुळीचे वादळ महाराष्ट्रात धडकले

datta jadhav