Tarun Bharat

विजेची तार अंगावर पडल्याने चार शेळ्या जागीच ठार

Advertisements

कडेगाव / प्रतिनिधी

शिवाजीनगर ता. कडेगाव येथील एम.आय.डी.सी हददीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता विज वितरण कंपनीची विजेची प्रवाहीत तार अंगावर पडल्याने चार गाभण शेळ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे अरूण रास्कर या गरीब शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अरूण किसन रास्कर हा आपल्या शेळ्या दिवसभर शेतात चारून सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर गावात एम.आय.डी.सीच्या रस्त्यावरून येत असतानाच अचानक विद्युत प्रवाहित तार ४ शेळ्यांच्या अंगावर पडल्याने ४ शेळ्या जागीच ठार झाल्या तर आवाज झाल्यावर इतर शेळ्या पळून गेल्या यामुळे त्या शेळ्या वाचल्या केवळ दैव्य बलवत्तर म्हणून ही तार अरूण यांच्या अंगावर पडली नाही.

एकंदरीत चार गाभण शेळ्या अंदाजे कमीत कमी एक लाख रूपयांचे नुकसान झाले. सायंकाळी सहा वाजता पंचायत समितीचे पशु वैद्यकीय डॉक्टर शिपुरे यांनी भेट दिली. नुकसान ग्रस्त शेळी पालक अरूण रास्कर यांना विज वितरण कंपनीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Related Stories

भटक्या जनावरांसाठी ‘अॅनिमल अॅम्ब्युलन्स’ देणार : पालकमंत्री सतेज पाटील

Archana Banage

रेड झोनमधून येणाऱ्यांचा सक्तीने स्वॅब आणि संस्थात्मक अलगीकरण, अलगीकरणाचा खर्च संबंधितांकडून

Archana Banage

स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी – राजू शेट्टी

Archana Banage

सांगली : सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी केला एव्हरेस्ट सर

Archana Banage

ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

रायगड संशयित बोट प्रकरणात ATS ची नविन माहिती; एके-47 सह बोटीवर 2 तलवारीसह चॉपरही आढळले

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!