Tarun Bharat

विजेच्या धक्क्याने केरी सत्तरीतील पंचायत शिपाईचा मृत्यू

Advertisements

पर्ये / वार्ताहर

केरी सत्तरीतील ग्रामपंचायत शिपाई उत्तम लक्ष्मण गावस( 46) यांचे आज सकाळी विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाला. आज सकाळी केरी येथे त्याच्या राहत्या घरी आपल्या बागायतीला पाणी लावण्यासाठी विजेवरील पंप सुरू करायला गेला असता विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याना साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात व पुढे गो. मे. का. इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह घरी आणून संध्याकाळी खाजगी जागेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांत आणि प्रेमळ स्वभावाचे असलेले उत्तम गावस हे ग्रामपंचायत प्य?न असल्याने केरीतील परिचित असे व्यक्ती होते. ते ग्रामपंचायतीमध्ये येणाऱयांना प्रेमळपणे मदत करायचे. त्यांच्या अशा अकाली अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व भाऊ- भावजय असा परिवार आहे.

Related Stories

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी द्या

Patil_p

शैलेंद्रना झालेली मारहाण क्रूरतेची परिसीमा

Patil_p

मडगाव पालिका मुख्याधिकारीपदाची सूत्रे रोहित कदम यांनी स्वीकारली

Amit Kulkarni

राजकारण बदलण्याच्या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत व्हा

Amit Kulkarni

डॉ.विशाल च्यारी यांना अर्थशास्त्रातील कार्यासाठी पुरस्कार

Amit Kulkarni

आखाडा येथील शाळा जपण्याची गरज

Amit Kulkarni
error: Content is protected !!