Tarun Bharat

विज्ञानाला भारताचे योगदान…

अनन्तपारं किल शब्दशास्त्रं स्वल्पं तथायुर्बहवश्च विघ्नाः। सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्।।…अर्थः- शब्दांचे शास्त्र अपार व अनंत आहे. आयुष्य थोडे आहे व विघ्ने पुष्कळ आहेत. म्हणून जसा हंस पाणीमिश्रित दुधातून दूध तेवढे घेतो व पाणी टाकतो, त्याप्रमाणे सार तेवढे घ्यावे, असार टाकावे..  येथे शब्दांचे शास्त्र असा मर्यादित अर्थ नाही. तर अनंत प्रकारचे ज्ञानभांडार असा आहे.  माणसाच्या मर्यादित आयुष्यात ते सर्व मिळवणे शक्मय नाही. न्यूटन म्हणतो, जगातील ज्ञानभांडार वाळवंटाएवढे आहे व माझे ज्ञान या वाळूच्या कणाएवढे आहे. कोरोना महामारीवर भारतातील तीन वैज्ञानिक संस्थांनी प्रतिबंधक लस शोधून काढली आणि साऱया जगाचे लक्ष भारताकडे वळले. हे ज्ञान कुठून आले? तर अर्थातच अनेक ग्रंथांच्या अभ्यासाने, विविध प्रयोग केल्यामुळे, परीक्षा केल्यामुळे. हे विज्ञान विषयाचे ज्ञान आहे. विज्ञानाची ही परंपरा भारताला वेदकाळापासून हजारो वर्षांपासून लाभली आहे. कोरोना लसीमुळे साऱया जगात देशाची मान अभिमानाने उंचावली! भारताने अगदी वेदकाळापासून साऱया जगाला अनेक प्रकारच्या विज्ञानाची देणगी आजपर्यंत दिली आहे. परंतु कालौघात काही ग्रंथ नष्ट झाले, बरेचसे दुर्लक्षित झाले, तरीही हजारो वर्षांपूर्वी, इ.स.पूर्व पहिल्या, दुसऱया शतकात भारतात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र इ. विज्ञानाच्या  बऱयाचशा शाखा विकसित होत्या. आपल्याला माहीतच आहे की, गणितातील शून्याचा शोध भारतात लागला आणि त्यामुळे गणित जास्त सोपे झाले. दशमान पद्धती उपयोगात आणली गेली. भारतात ती 2,000 वर्षांपूर्वीपासून उपयोगात आणली जात आहे. अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिति यातील बरेचसे मौलिक संशोधन भारतातच झाले आहे. भारतातील धातुशास्त्र विषयाचा शोध महत्त्वाचा आहे. वैदिक साहित्यात सोने-चांदी, तांबे, लोखंड यांचे विविध उपयोग यांचे वर्णन आहे. आपल्याकडील आयुर्वेद तर आता जगविख्यात आहे. अथर्ववेदात वनस्पतींचे वर्गीकरण केले आहे. वनस्पतींचे हे विभाजन 5,000 वर्षांपूर्वी केले गेले आहे. भारतीयांचे प्राचीन पदार्थविज्ञानशास्त्रही विस्तृत होते. परमाणुवादावर हिंदू तत्त्वज्ञान ग्रंथामध्ये मोठय़ा प्रमाणावर विचार केला आहे. महषी कणाद यांच्या वैशेषिक दर्शनात या विषयाचा उत्तम विचार केला गेला आहे. अशाप्रकारे इतरही अनेक विज्ञान क्षेत्रांमध्ये प्राचीन ऋषींनी कोणतीही साधने हाताशी नसताना फार सूक्ष्मपणे विचार केला. त्यामध्ये गतीविज्ञान, ध्वनिविज्ञान, प्रकाशविज्ञान, उष्णता विज्ञान इत्यादींचा समावेश आहे. आज विज्ञान दिनानिमित्त एवढेच पुरे! जय विज्ञान!! आज राष्ट्रमाता जिजाऊंचीही जयंती आहे. त्यांनाही याप्रसंगी शतशः प्रणाम!

Related Stories

अक्षय्य तृतीया, ईद आणि परशुराम जयंती

Amit Kulkarni

विचारदोषाची अनटोल्ड स्टोरी!

Patil_p

फडणवीसांची रणनीती आघाडी की खडसेंविरुद्ध?

Patil_p

मानवतेचा विचार

Patil_p

माजी सरन्यायाधीशांची खंत

Patil_p

सोने आयात 94 टक्क्मयांनी घटली

Patil_p