Tarun Bharat

विझिंजम बंदर हिंसेसंबंधी विधानसभेत होणार चर्चा

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी दर्शविली तयारी

वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम

केरळ विधानसभेने विझिंजम बंदराच्या विरोधात स्थानिक मच्छिमारांकडून केल्या जाणाऱया आंदोलनावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते आणि आमदार एम. व्हिन्सेंट यांनी या मुद्दय़ावर स्थगन प्रस्तावाची मागणी करणारी नोटीस सादर केली होती. ज्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन ायंनी स्वतःच्या उत्तरादाखल सरकार विधानसभेत यावर चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे सभागृहाला कळविले आहे.

राज्यात या मुद्याला गांभीर्याने पाहिले जात आहे. अन्य कामकाज रोखून यासंबंधी चर्चा करणे योग्य ठरेल असे विजयन यांनी म्हटले आहे. विझिंजम आणि अन्य किनारी क्षेत्रांमधील मच्छिमार निर्माणाधीन बंदराच्या विरोधात 4 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन करत आहेत, या आंदोलनादरम्यान 26-27 नोव्हेंबर रोजी हिंसा झाली होती. आंदोलकांनी 27 नोव्हेंबरच्या रात्री विझिंजम पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

विझिंजम बंदर हिंसाप्रकरणी केरळ पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पाद्रींनी जमावाला पाचारण करत चिथावणी दिल्यानेच हिंसा झाली. यूजीन एच. परेरा यांच्या नेतृत्वात निदर्शकांनी निर्माणसामग्री नेत असलेल्या अवजड वाहनांना विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर रोखले होते. जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. या घटनेत अनेक पोलीस जखमी झाल्याचे तिरुअनंतपरुम शहराच्या पोलीस आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

Related Stories

निर्भया : चारही दोषींना होणार एकत्रच फाशी!

prashant_c

तुनिषा शर्माची आत्महत्या लव्ह जिहाद असेल तर…भाजप आमदार राम कदम यांचा इशारा

Abhijeet Khandekar

भाजप पुढील दहा वर्षाचा विकास अजेंडा गोमंतकियांसमोर ठेवणार

Abhijeet Khandekar

पत्नी न परतल्याने पतीचा ‘प्रताप’

Patil_p

मनोज तिवारी यांची केजरीवालवर जोरदार टीका

prashant_c

केंद्र सरकार करणार 13 एअरपोर्ट्सची विक्री

datta jadhav