Tarun Bharat

विटेकरांनी केला आरोग्य सुविधा उभा करण्याचा संकल्प

Advertisements

प्रतिनिधी/विटा

कोरोनावर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा उभा करण्याचा संकल्प समितीने केला आहे. त्याला तालुका आणि शहरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर विटा मध्ये विटा बचाव कोरोना समिती काही दिवसापूर्वी स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते त्याचबरोबर सामाजिक संघटनांचा समावेश आहे. समितीच्या माध्यमातून विट्यामध्ये 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असा चार दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. विटेकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच प्रशासनाने सहकार्य करून शंभर टक्के यशस्वी झाला.

समितीने जनता कर्फ्यू करत असताना प्रशासन तसेच आरोग्य विभाग व नागरिक यांच्यामध्ये एक दुवा बनण्याचं सूत्र प्रथम पासूनच अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विट्यातील ग्रामीण रुग्णालय, ओमश्री हॉस्पिटल त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन सेंटर येथिल आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्या ठिकाणी असणारी उपकरणांची कमतरता जाणून घेतली. त्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात केली.

खानापूर तालुका हा प्रथमपासूनच दानशूर व्यक्तींचे आगार राहिले आहे. बघता बघता स्थानिक व्यवसायिक तसेच तालुक्यातील भारतभरामध्ये पसरलेले गलाई व्यवसायिक यांच्या मदतीचा ओघ सुरू झाला. कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लागणारी ऑक्सिजन देणारी यंत्रणा म्हणजेच हाय फ्लो ऑक्सिजन नोजल मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट अशी सुमारे दोन लाख 87 हजार पाचशे रुपयांची यंत्रणा आज विटा ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द करण्यात आली.

विटा बचाव कोरोना समितीने प्रथमपासूनच सुविधांच्या अभावाने नागरिकाचा जीव गेला नाही पाहिजे, हे धोरण स्विकारले आहे. समितीकडे मोठ्याप्रमाणात मदतीचा ओघ येत आहे. जास्तीत जास्त जीवन रक्षक उपकरणे विट्यामध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णालयांना देण्याचे समितीने ठरवले आहे. समितीच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून विट्यातील वारे हॉस्पिटल हे कोविंड रुग्णालय म्हणून शासनाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे, अशी माहिती समितीच्यावतीने देण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि स्टाफ तसेच विटा बचाव कोरोना समितीचे सदस्य उपस्थित होते

Related Stories

सांगली : बामनोलीच्या माजी तंटामुक्त अध्यक्षांची गळफास घेत आत्महत्या

Abhijeet Shinde

मिरजेतील डि मार्ट मॉलला 20 हजारांचा दंड

Abhijeet Shinde

बनावट नोटा बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Abhijeet Shinde

सांगली : सुभाषनगरमध्ये घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव तालुक्‍यात आज 64 रुग्ण

Abhijeet Shinde

कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले आकाश दर्शनाचे धडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!