Tarun Bharat

विदर्भ क्रिकेट संघटनेकडून पंचांचे मानधन थकित

Advertisements

वृत्तसंस्था/ नागपूर

कोरोना महामारी संकटाचे विपरित परिणाम देशाच्या आर्थिक घडामोडीवर होत आहेत. या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील सर्व घडामोडी पूर्णपणे थांबल्या आहेत. शासनाच्या लॉकडाऊन निर्णयामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेकडून क्रिकेट पंचांना अद्याप मानधन देण्यात आलेले नाही. पंचांचे हे मानधन गेल्या डिसेंबरपासून थकित आहे.

2019 क्रिकेट हंगामातील सामन्यात पंचगिरी केलेल्या अनेक पंचांना त्यांचे मानधन मिळालेले नाही. या पंचांनी मार्च महिन्यापर्यंत बऱयाच क्रिकेट सामन्यात पंचगिरी केली आहे पण विदर्भ क्रिकेट संघटनेकडून त्यांना अद्याप मानधन देण्यात आलेले नाही. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या पंचांच्या पॅनेलमधील काही जणांना 12 डिसेंबर रोजी थकीतपैकी काही रक्कम मिळाली होती. क्रिकेट पंचांना आर्थिक समस्येला सध्या तोंड द्यावे लागत आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे दोन दिवसांची गुझदेर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती पण या स्पर्धेतील केवळ पाच सामने झाल्यानंतर कोरोनामुळे ही स्पर्धा अर्धवट स्थितीत थांबवी लागली होती. 31 मार्चपर्यंत ही स्पर्धा संपविण्यात येणार होती पण प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली असल्याने विदर्भ क्रिकेट संघटनेला मोठा आर्थिक फटका बसला असल्याने त्यांच्याकडून पंचांचे मानधन थकित राहिले आहे.

Related Stories

मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये छगन, कविता विजेते

Patil_p

मेदव्हेदेव, सिटसिपेस उपांत्य फेरीत

Patil_p

सामना वाचवण्याचे भारतासमोर आव्हान

Patil_p

मुंबई संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे

Patil_p

भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबरला आमनेसामने

Patil_p

न्यूझीलंडकडूनही आयपीएल भरवण्याचा प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!