Tarun Bharat

विदेशी चलन साठय़ात 2.5 अब्ज डॉलरची वाढ

नवी दिल्ली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलन साठय़ामध्ये 2.5 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. 18 नोव्हेंबरला संपलेल्या आठवडय़ामध्ये विदेशी चलन साठा 2.5 अब्ज डॉलर्सने वाढून 47.25 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. मे महिन्यानंतर प्रथमच सलग दोन आठवडे चलन साठय़ामध्ये वाढ दिसली आहे.

रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. 11 नोव्हेंबरला संपलेल्या याआधीच्या आठवडय़ामध्ये रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन साठय़ामध्ये 14.7 अब्ज डॉलरशी भर पडली होती. मागच्या आठवडय़ात केंद्रीय बँकेच्या विदेशी मालमत्तेमध्ये वाढ झाल्याच्या कारणामुळे चलन साठय़ात वाढ झाल्याचे सांगितले जाते.

रुपया घसरणीतच

18 नोव्हेंबरला संपलेल्या आठवडय़ामध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत 1 टक्का घसरला होता. आत्तापर्यंत भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 9 टक्के घसरलाय.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

नवी दिल्ली ः चीनमध्ये सरकारविरोधात आवाज उठवला जात असतानाच सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण अनुभवायला मिळाली. सोमवारी कच्च्या तेलाचे भाव बॅरेलमागे 1 डॉलर घट नोंदवत होते. मागच्या आठवडय़ात बेंट प्रुड अर्थात कच्चे तेल 4.6 टक्के इतके घसरले होते. चीनमध्ये लॉकडाऊनमुळे रहिवाशांसह सारेच हैराण झाले असून औद्योगिक गतीही धीमी झाल्याने तेथे कच्च्या तेलाची मागणी रोडावली आहे. परिणामी दिवसेंदिवस कच्च्या तेलाच्या किमती खाली येत आहेत.

Related Stories

शेअरबाजारात सेन्सेक्सची वधाराने सांगता

Patil_p

67 हजार 400 कोटीचा परतावा

Patil_p

मॅक्सिमा मॅक्स प्रो एक्स 6 स्मार्टवॉच लाँच

Patil_p

ओला वित्त सेवा संस्थेत करणार गुंतवणूक

Amit Kulkarni

‘आयआरसीटीसी’च्या गुंतवणूकदारांची चांदी

Patil_p

चिप तुटवडय़ामुळे कार उत्पादनावर होणार परिणाम

Patil_p