Tarun Bharat

विदेश दौऱयावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार

मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांची माहिती

प्रतिनिधी/ बेंगळूर

स्वित्झर्लंडमधील दावोस दौऱयावरुन परतल्यानंतर दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. याबाबत कोणतेही गोंधळ नको, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. विदेश दौऱयावर जाण्यापूर्वी त्यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्तारासह राज्यातील घडामोंडींबाबत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली आहे. तसेच त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा गोंधळ दूर होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणे स्वाभाविक आहे. तसेच आपण इतर आमदारांशीही चर्चा केली आहे. कोणामध्येही असमाधान नाही. पक्षाच्या निर्णयाला सर्वजण कटिबद्ध असून माध्यमांकडून केवळ अफवा पसरविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 शनिवारी अमिश शहा यांच्यासोबत बेंगळूरहून हुबळीला येताना विमानामध्ये येडियुराप्पांनी मंत्रिमंडळ विस्तार तसेच राजकीय घडामोंडीबाबत चर्चा केली आहे. मात्र, हुबळीतील हॉटेलमध्ये चर्चा न होताच बेंगळूरला परतल्याने पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होणार का?, अशी चर्चा राज्य भाजपमध्ये सुरू आहे. या सर्व चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोसहून आल्यानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छूक असणाऱया आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

कुमठहळ्ळी, श्रीमंत पाटील यांना निगम मंडळ अध्यक्षपद?

मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यावी, याची यादी अमित शहा यांनी येडियुराप्पा यांच्याकडे दिल्याचे समजते. काँग्रेस आणि निजदमधून भाजपमध्ये येत पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या 11 आमदारांपैकी 9 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे समजते. रमेश जारकीहोळी-गोकाक, बी. सी. पाटील-हिरेकेरूर, आनंद सिंग-विजयनगर, के. सी. नारायणगौडा- केआर पेठ, भैरती बसवराज-केआर पूरम, एस. टी. सोमशेखर- यशवंतपूर, के. गोपालय्या-महालक्ष्मी लेआऊट, डॉ. के. सुधाकर- चिक्कबळ्ळापूर, शिवराम हेब्बार-यल्लापूर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर महेश कुमठहळ्ळी-अथणी आणि श्रीमंत पाटील-कागवाड यांना निगम मंडळाचे अध्यक्षपद देण्यात येईल, असा भरवसा देण्यात आल्याचे समजते.

Related Stories

…ही तर लोकशाहीची हत्या – राहुल गांधीचा मोदी सरकारवर घणाघात

Abhijeet Khandekar

पालकांनी विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार करण्याची मुभा द्यावी : पंतप्रधान मोदी

Archana Banage

2 अपघातात 14 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

काँग्रेस नेत्यांसोबत नरेश पटले यांची चर्चा

Patil_p

मुंबई हल्ल्याला काँगेसचे प्रत्युत्तर दुबळे

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 71,000 नियुक्तीपत्रे दिली जाणार

Patil_p