Tarun Bharat

विद्यापीठ सेवक संघाचे माजी सरचिटणीस अतुल ऐतावडेकर यांचे निधन

कोल्हापूर/ प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे माजी सरचिटणीस अतुल जयवंत ऐतावडेकर (वय ५४, रा. सुभाषनगर) यांचे हृदयविकाराने गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

अतुल ऐतावडेकर हे शिवाजी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते. विद्यापीठ सेवक संघाचे माजी सरचिटणीस व खजानिस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे पश्चिम विभागीय समन्वयक म्हणून कार्यरत होते. २०११-१२ रोजी त्यांना शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीच्यावतीने ‘शिव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरूवारी पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

नुकतेच विद्यापीठ सेवक संघाचे नेते बाबा सावंत यांचे निधन झाले. त्यातच ऐतावडेकर यांच्या निधनाने विद्यापीठ सेवक संघ व शिवाजी विद्यापीठावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँकेसाठी नव्याने ठराव

Archana Banage

हालोंडीत पंचवीस एकर ऊस, दीड एकर केळीची बाग जळून खाक

Archana Banage

इथेनॅाल निर्मितीसाठी गुराळघरांना परवानगी देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

Abhijeet Khandekar

बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगेत आढळला

Archana Banage

कोल्हापूर : प्रभाग रचना पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाची मंजुरी

Archana Banage

सत्तेत असताना अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना आवळा दिला, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Abhijeet Khandekar