Tarun Bharat

विद्यापीठ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक वि. गो. देसाई यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

भक्ती-सेवा विद्यापीठ हायस्कूलचे संस्कृत विषयाचे निवृत्त शिक्षक विनायक गोविंद तथा वि. गो. देसाई गुरुजी (वय 87, रा. साने गुरूजी वसाहत) यांचे गुरूवारी पहाटे गोवा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, संस्कृत विषयाचे पंडित आणि राज्यशासनाने `संस्कृत पंडित’ म्हणून सत्कार केलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व असा त्यांचा लौकिक होता.

संस्कृतचे शिक्षण त्यांनी मठांमध्ये राहून माधुकरी मागून पूर्ण केले होते. कोल्हापूर भूषण, वेद शास्त्र संपन्न पंडित कै. श्रीपाद शास्त्री जेरे यांचे ते शिष्य होते. विद्यापीठ हायस्कूलमधून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीता मंदिरच्या माध्यमातून आपले ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवले होते. गोव्यातील ऍटोमोबाईल व्यावसायिक जयंत देसाई यांचे वडील होत.

Related Stories

संभाव्य महापुराचा धोका नाही : मंत्री शशिकला जोल्ले

Archana Banage

शिंगणापुर बंधाऱ्यावरुन रिक्षा पलटी होऊन चालक ठार

Archana Banage

निगवे दुमाला व परिसरातुन सकल मराठा समाजाच्यावतीने सदावर्तेंचा तीव्र निषेध

Archana Banage

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीला मुदत वाढ

Abhijeet Khandekar

पेठ वडगाव : वडगाव परिसरात फसवणुक कॉलचे प्रमाण वाढले नागरिकांनी सावध होण्याची गरज

Archana Banage

अथणी शुगर्सचे अंतिम बिल २८०० रुपये प्रमाणे

Archana Banage