Tarun Bharat

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा शिक्षक जेरबंद

‘10 परफेक्ट वुमन’ लिहिणार होता पुस्तक

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

कुख्यात शिक्षक धवल त्रिवेदीला दिल्ली पोलिसांच्या पथकाने अखेर अटक केली आहे. त्रिवेदीच्या विरोधात सीबीआयने 5 लाख रुपयांच इनाम घोषित केले होते. या शिक्षकाला हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्हय़ातून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लव्हगुरु या नावाने कुप्रसिद्ध आरोपी धवल त्रिवेदी (50 वर्षे) याला लैंगिक शोषणाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु तो संचित रजेवर तुरुंगातून बाहेर पडला होता. धवलने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. तर 9 महिलांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळय़ात अडकवून त्याने पळवून नेले होते. यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. त्रिवेदी ऑगस्ट 2018 पासून फरार होता.

धवलला स्वतःच्या दृष्कृत्यांवर किंचितही पश्चाताप नाही. एक पुस्तक लिहिण्याची योजना असून त्याचे नाव ‘10 परफेक्ट वुमन इन माय लाइफ’ असे राहणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये  पॉक्सो कायद्यांतर्गत नोंद गुन्हय़ाप्रकरणी उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. संचित रजेनंतर तो फरार झाला होता. 12 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या पथकाने त्रिवेदीचा ठावठिकाणा हुडकून काढल्याचे माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

राज्यातील 21 पोलिसांना राष्ट्रपती पदक

Patil_p

गँगस्टर मुख्तार मलिकचा राजस्थानमध्ये मृत्यू

Patil_p

युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

Abhijeet Khandekar

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार योजनेचा प्रारंभ

Patil_p

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

datta jadhav

काँग्रेसला दररोज 4 क्विंटल शिव्या देतात मोदी

Patil_p