Tarun Bharat

विद्यार्थिनींशी असभ्य बोलणाऱया शिक्षकास चोप

कोननकेरी येथील घटना : बीईओंच्या वाहनाच्या काचा फोडल्या

वार्ताहर/ बुगटेआलूर

विद्यार्थिनींशी असभ्य स्वरूपात बोलत असल्याच्या रागातून शिक्षकाला मारहाण केल्याची घटना कोननकेरी (ता. हुक्केरी) येथील कन्नड शाळेत बुधवारी दुपारी घडली. यावेळी त्या शिक्षकास मारहाणीपासून वाचविण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱयांच्या गाडीमध्ये बसविले असता ग्रामस्थांनी सदर गाडीच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला.

 कोननकेरी येथील कन्नड शाळेमध्ये जी. बी. बायण्णावर हा शिक्षक विद्यार्थिनींशी असभ्य भाषेत बोलत होता. विद्यार्थिनींनी ही बाब पालकांना सांगितल्यावर पालकांनी याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली होती. त्यानुसार मुख्याध्यापकांनी महिन्याभरापूर्वी सदर शिक्षकास कमतनूर येथील शाळेत पाठविले. दरम्यान बुधवारी कोननकेरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलविलेल्या बैठकीमध्ये सदर शिक्षकाचा विषय निघाला. यावेळी पालकांनी सदर शिक्षकास बोलावून घेण्यास सांगितले. शिवाय गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनाही बोलावून घेण्यात आले.

दाखल झालेल्या बायण्णावर याने आपली चूक मान्य केली. याचदरम्यान ग्रामस्थांनी त्या शिक्षकास मारहाण करण्यास प्रारंभ केला. ग्रामस्थांपासून वाचविण्यासाठी शिक्षकास बीईओंच्या वाहनामध्ये बसविण्यात आले. तेंव्हा संतप्त ग्रामस्थांबी बीईओंच्या वाहनाच्या काचा फोडल्या. दरम्यान सदर शिक्षकास निलंबित करण्याचे आश्वासन बीईओंनी दिल्यावर ग्रामस्थांचा राग शांत झाला. 

निलंबनाची कारवाई करणार

सदर शिक्षकाने आपली चूक मान्य केली असून, त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव आपण डीडीपीआय यांच्याकडे पाठविणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी दिली.

Related Stories

यात्रा मंगाई देवीची, जपणूक परंपरेची

Amit Kulkarni

नागरिकांकडून कोविड-19 ची मार्गदर्शकप्रणाली पायदळी

Omkar B

दांडेलीत 15 फुटी अजगर पकडला

Amit Kulkarni

नाटय़ परिषदेतर्फे आज आदिनाथ पाटील यांचे गायन

Amit Kulkarni

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Patil_p

कॅन्टोन्मेंट निवडणुकीबाबत खासदारांच्या सूचनेला केराची टोपली

Amit Kulkarni