Tarun Bharat

विद्यार्थी भवन सुवर्ण महोत्सव स्मरणिका काढण्यास मान्यता

Advertisements

-डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात 1969 साली डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनची स्थापना झाली आहे. या वसतिगृहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका काढण्यास मान्यता मिळाली आहे. हा निर्णय शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याबरोबर झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यापीठातील माजी कुलगुरू, माजी अधिकारी, विद्यार्थी यांचे लेख मागवून स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापणदिनी 18 नोव्हेंबर रोजी या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू यांचा पुर्नाकृती पुतळा स्थापन करा, अशी मागणी गेल्या दहा वर्षापासून विद्यापीठाच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या डॉ. आप्पसाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनीच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रबोधिनीच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी भेट घेवून चर्चा केली. परंतू पुढच्या आठवडÎात बैठक घेवून निर्णय घेण्याचे ठरले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,  विद्यार्थी भवन कमवा व शिका योजना अधीक्षक डॉ. निलेश तरवाळ, प्रबोधिनीचे प्रा. किसनराव कुराडे, डॉ. सी. पी. पवार, डॉ. एस. जे. नाईक, प्राचार्य जी. पी. माळी. डॉ. एम. पी. हजारे, डॉ. टी. के. सरगर आदी उपस्थित होते.

Related Stories

ई-पास बंद न केल्यास शुक्रवारपासून तीव्र आंदोलन

Sumit Tambekar

हलकर्णी फाट्यावर दौलत कामगारांची सहकुटुंब निदर्शने

Abhijeet Shinde

सोमय्यांचे स्वागत, पण बेताल वक्तव्य नको : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

आजरा तालुक्यातील शिवसेना ‘मातोश्री’सोबत!

Kalyani Amanagi

पेठवडगावात बारा कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्ण संख्या ६८

Abhijeet Shinde

Kolhapur : प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!