Tarun Bharat

विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलणार महाविद्यालये

दहावी शंभर टक्के निकालाचा परिणाम : प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी, पालकांची लगबग, गतवषीच्या तुलनेत सव्वापट विद्यार्थी वाढले

प्रतिनिधी / निपाणी

नुकताच दहावी परीक्षेचा निकाल लागला. कर्नाटक राज्यात 99.99 टक्के विद्यार्थी पास झाले. निपाणी तालुक्मयातही सर्वच हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. याचा परिणाम म्हणून यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेला गतवषीच्या तुलनेत सव्वापट विद्यार्थी वाढले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गर्दीने बहुतांशी महाविद्यालये फुलणार असल्याचे चित्र यंदा पहायला मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सलग दुसऱया वषी दहावी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यानंतर परीक्षा होईल की नाही?, अशी शक्मयता वर्तविली जात असताना गेल्या महिन्यात 19 व 22 जुलै या दोन दिवसात परीक्षा आटोपण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दोनच दिवसात परीक्षा संपविण्याचे सोपस्कार शासनाने पूर्ण केले. त्यामुळे राज्यातील जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ’यशाचे शिखर’ गाठले.

यानंतर आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक वर्गाची लगबग असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. अकरावीबरोबरच डिप्लोमा, आयटीआय, फार्मसी यासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सर्व विद्यार्थी पास झाल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला अच्छे दिन आले आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थी संख्या यंदा वाढणार आहे.

गतवषी अचानक 22 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे दहावी परीक्षेच्या सराव चाचण्या झाल्या नाहीत. उर्वरित अभ्यासक्रमही ऑनलाईन स्वरूपात शिकविण्यात आला. मात्र यातून योग्य प्रकारे आकलन न झाल्यामुळे गेल्या वषी दहावी परीक्षेत निकालाचा टक्का घसरला. अशातच यंदा पुन्हा कोरोनाची लाट पसरली. त्यामुळे दहावी परीक्षा घ्यायची की नाही या संभ्रमात शासन होते. यातून तोडगा काढत दोन दिवसात दोनच प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून परीक्षा घेऊन त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शंभर टक्के निकालामुळे हायस्कूल प्रशासनालाही दिलासा मिळाला.

दरवषी अकरावी अथवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांत चुरस होत होती. यंदा मात्र विद्यार्थी मुबलक उपलब्ध असल्यामुळे बहुतांशी महाविद्यालयातील प्रवेश फुल्ल होणार आहेत.

त्यामुळे महाविद्यालय प्रशासनालाही दिलासा मिळत असल्याचे चित्र निपाणी शहर व परिसरात दिसून येत आहे.

Related Stories

अंतर्गत बदली प्रकरणी आयुक्तांनी बजावली नोटीस

Patil_p

कर्नाटकातील एसएसएलसीचा निकाल जाहीर

Tousif Mujawar

शहरात वाहतूक क्यवस्थेचे तीनतेरा

Patil_p

परराज्यातून येणाऱया चाकरमान्यांच्या संख्येत वाढ

Patil_p

प्रवीण देसाई यांच्याकडून कोरोना योद्धय़ांचा सन्मान

Patil_p

हिंडलगा कारागृहात सलोख्याचे दर्शन

Amit Kulkarni