Tarun Bharat

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी बसेसची सोय करणार; खासगी बस वाहतूक संघटनेचा निर्णय

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यात वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परिक्षा सुरू झाल्या आहेत. सध्या एस.टी. सेवा बंद असल्यामुळे परिक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोटी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे खासगी बस वाहतूकदारांची बैठक होऊन, प्रशासनाच्या नियोजनानुसार आमच्या बसेस विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय या र्बैठकीत घेण्यात आला. या सेवेमध्ये येणाऱ्या कांही अडचणी दूर कराव्यात अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. हे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले.

ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थांना जाणे शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही आमच्या बसेस विनामूल्य दरात उपलब्ध करून देणार आहोत. याबाबतचे नियोजन आपण करावे .यासाठी त्याप्रमाणे माहिती द्यावी. यासाठी आम्ही बसेसची व्यवस्था करत आहोत. यामुळे पुढील नियोजन करणे शक्य होणार आहे. या संपाच्या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत व त्यांना इच्छित स्थळी जाता यावे यासाठी, दुसऱया मार्गावरील बसेस मागवून घेऊन गदींच्या ठिकाणी या बसेस सोडत आहोत. शासनाने केलेल्या एस.टी. दराच्या दीडपट दर आकारणीच्या निर्बंधांमुळे बस मालकांचा तोटा होत आहे. त्यामुळे या सेवा चालवणे अवघड झालेले आहे. तरी याबाबत शासनाने याचा पुनर्विचार करून भाडयाचा दर दुप्पट करावा.

प्रवासी वाहतूक करणाऱया बसेसवर, विनाकारण, कारवाई करू नये. अशा मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. यावेळी सतीशचंद्र कांबळे, गौरव कुसाळे, उत्कर्ष पोवार,बाबा बुचडे, रियाज मुजावर, रफिक रावथर, इम्तियाज हकीम, गुंडा घाटगे, किरण शिंदे, उज्वल लिंग्रज, फिरोज तहसीलदार,जाकिर तहसीलदार,फारूक मुल्ला, रियाज शेख, इर्शाद फरास, अरुण देवकुळे, मधुकर माने आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : राजाराम बंधाऱ्यावरून चारचाकी थेट पंचगंगेत, पाण्याच्या प्रवाहात गेली वाहून (Video)

Abhijeet Shinde

इचलकरंजीतील कुख्यात विक्या मन्या गँगविरोधी डब्बल मोका

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अलायन्स एअरची हैदराबाद-कोल्हापूर विमानसेवा अखंडित सुरू

Abhijeet Shinde

मुंबई, पुण्याच्या चित्रपट निर्मात्यांना रेड कार्पेट नको

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्या भावाचा बहिणीवर विळ्याने हल्ला

Abhijeet Shinde

राजारामपुरीतील मुक्ता पब्लिकेशनवर `आयकर’चे छापे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!