Tarun Bharat

विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी / सांगली

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हयाच्यावतीने करण्यात आली. यामागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार व विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ. शुभम जाधव म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून देशातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यामध्ये सातत्याने तफावत आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी मागणी आम्ही करत आहोत असे सांगितले.

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव, शहरजिल्हा उपाध्यक्ष , संदीप व्हनमाणे, शहरजिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे, सचिन चव्हाण, ऋषिकेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

सांगली : विटा येथे दहा वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

Archana Banage

आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीस यश

Archana Banage

मिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम

Archana Banage

सांगलीत 497 नवे रुग्ण तर 685 जण कोरोनामुक्त

Archana Banage

Gram Panchayat Election : बीड जिल्ह्यासाठी एसटी नसल्याने प्रवाशांचा गोंधळ

Archana Banage

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते इस्लामपूर येथे कोविड रुग्णालयाचे होणार लोकार्पण

Archana Banage