Tarun Bharat

विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱयांवर कारवाई करा

प्रतिनिधी/कोल्हापूर

शालेय विद्यार्थ्यांना मोर्चा,रॅली,फेरीसाठी पाठवण्यात येऊ नये अशा घोषणा शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून होतात.रस्ता सुरक्षा सप्ताहांगर्तत मंगळवारी विद्यार्थ्यांना रॅलीत आणले होते.यामुळे या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर शहर व नागरी कृती समितीने निवेदनाद्वारे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली.

कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शिक्षण उप-संचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना शाळेतून रॅली,मोर्चा अशा कार्यक्रमांना पाठवल्यास संबंधित शाळा व संयोजकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. असे असताना मंगळवारी एका कार्यक्रमासाठी उन्हात दोन ते अडीच तास रस्त्यावर होते.या रॅलीची परवानगी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली होती का? मुलांना वेठीस धरले त्यांच्यावर कारवाई करणार का?गेल्या दीड वर्षात अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाळेतून रस्त्यावर घेऊन येणाऱयांवर काय कारवाई केली याचा खुलासा करण्याची मागणी केली.

यावेळी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी या घटनेची चौकशी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन कृती समितीला दिले.या शिष्टमंडळात माजी नगरसेवक अशोक माने,श्रीकांत भोसले,रवि चव्हाण,अशोक पोवार,रमेश मोरे,विनोद डुणुंग,दिपक गौड,शंकरराव शेळके,सुभाष वाणी,मधुकर पाटील,उत्तम वंदूरे,अंजुम देसाई,महादेव जाधव,रामभाऊ कोळेकर,एस.एन.माळकर,सुरेश पाटील,चंचल देशपांडे,रवि चव्हाण,चंद्रकांत सूर्यवंशी,महेश जाधव, परवेज सय्यद यांचा समावेश होता.

Related Stories

सरकारी दवाखान्यात दिव्यांग सेवा केंद्र चालु करणासाठी प्रयत्न करणार

Archana Banage

चलो पुणे…संभाजीराजे 12 तारखेला करणार भूमिका जाहीर

Abhijeet Khandekar

पुराच्या पाण्यातून जीवघेणी वाहतूक, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास

datta jadhav

कोल्हापूर : माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न

Archana Banage

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage

आवळी जवळ अपघातात दुचाकीची अॅपेरिक्षाला धडक आठ जखमी

Archana Banage