Tarun Bharat

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

बेनकनहळ्ळी येथील शिवराज हायस्कूलमध्ये पालक मेळावा

वार्ताहर/ कुद्रेमनी

कोरोना परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्य सुरक्षिततेची काळजी घ्यावी व पालकांनी मुलांकडे लक्ष देणे जरुरीचे आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे माजी चेअरमन व हिंडलगा ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य डी. बी. पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे विद्यागम-2 व दहावीतील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात 31 डिसेंबर रोजी शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नारायण पाटील होते.

मुख्याध्यापक एम. डी. पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात सरकारी नियमांची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष परशुराम पिसाळे, नारायण पाटील, डी. बी. पाटील, एम. डी. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी शिक्षक आर. एन. पाटील, श्रीमती आर. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शाळेला येत असताना कशी दक्षता घ्यावी व अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती आर. ए. परब यांनी सूत्रसंचालन केले. जी. आय. पाटील गुंजटकर यांनी आभार मानले.

Related Stories

हुबळीच्या व्यापाऱ्याचा केरळमध्ये कोरोनाने मृत्यू

Archana Banage

बेनाडीतील कुस्तीचा सुनील फडतरे मानकरी

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात दारू विकणाऱया युवकाला अटक

Amit Kulkarni

प्रा.गवीमठ यांचे साहित्यात मोठे योगदान

Omkar B

पेट्रोलसाठी महाराष्ट्रातील वाहनधारक कर्नाटकात

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीतील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील वृद्धेचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!