Tarun Bharat

विद्या मंदिर कणेरीवाडी राज्यासाठी रोल मॉडेल बनवणार

Advertisements

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

वि .म .कणेरीवाडी शाळा राज्यासाठी रोल मॉडेल बनवणार जि. प .माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत. शैक्षणिक वर्षे २०२० /२१ ची सुरुवात होत आहे, त्या अनुषंगाने वि म कणेरवाडी शाळेत व्यवस्थापन कमीटी ,गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व सर्व शिक्षक आदीची बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील ६५० पट असणारी कणेरीवाडी ही एकमेव शाळा आहे. गेल्या दोन कींवा तीन वर्षात सर्वच क्षेत्रात शाळा आघाडीवर आहे.

शिष्यवृत्ती, नवोदय, के. टी. एस. तसेच क्रीडा स्पर्धा, सांस्कृतीक स्पर्धा यामध्ये शाळेने लक्षणीय यश मिळविले आहे. शाळेमध्ये ज्या ज्या भौतिकसुविधा अपूर्ण आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही. त्यासाठी माजी विद्यार्थी ,पालक विद्यार्थी ,शिक्षण प्रेमी यांचे सहकार्याने ग्रामपंचायत व जि. प .फंडातून वीस लाखापर्यंत निधी उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच गेल्या पंधरा वर्षात जि प च्या माध्यमातून शाळेत केलेल्या विविध गोष्टीची माहीती दिली. ही शाळा म्हणजे राज्याला रोल मॉडेल व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनीव्यक्त केली.

शालेय व्यवस्थापन चे अध्यक्ष कुमार मोरे यानी बोलताना सांगितले कि , शाळेच्या सध्याच्या विकासात मागील कमिटीचे खुप मोठे योगदान आहे तोच वसा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत . शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या अडचणी आम्ही दुर करु पण विद्यार्थीच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही . प्रमुख पाहुणे म्हणून प. स .करवीर चे गटशिक्षणाधिकारी शंकर यादव उपस्थित होते. सुरुवातीलाच जिल्हा आदर्श शिक्षक नंदकुमार वड्ड यानी तसेच वि. म. जरगनगर चे मुख्याध्यापक गुरव यानी मार्गदर्शन केले .
श्री स्वामी समर्थ हायस्कूल कणेरीवाडीचे शिक्षक राम कदम यांनी शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक राहुल ढाकणे यानी स्वागत केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सलीम जमादार यानी मानले. बैठकीसाठी गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी .प्रतिष्ठित नागरीक ,ग्रामपंचायतचे सरपंच, डेपोटी सरपंच ,सदस्य , ग्रामसेवक, शिवसेना तालुका प्रमुख विनोद खोत , सोसायटीचे चेअरमन सदस्य तसेच व्यवस्थापनचे सर्व सदस्य , शिक्षक वर्ग उपस्थित होता

Related Stories

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करा; हिंदूत्ववादी संघटनांची मागणी

Archana Banage

`थेटपाईपलाईन’चे काम मे पर्यंत पूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

Archana Banage

पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह

Tousif Mujawar

राज ठाकरेंना पुन्हा कोरोना, आज होणारी शस्त्रक्रिया लांबणीवर

datta jadhav

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको; CM ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण!

Archana Banage

पूरस्थितीवर मात करण्यासाठी युतीचं सरकार कामाला लागलं; शंभूराजे देसाई

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!