Tarun Bharat

विद्युतीकरणाने रेल्वेची गती वाढणार

नैर्त्रुत्य रेल्वे विभागात 511 कि. मी. काम पूर्ण : प्रवासाचा वेळही होणार कमी

बेळगाव विभागातील या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

  • कुडची-घटप्रभा (47 कि.मी)
  • लेंढा-तिनईघाट (11 कि. मी.)
  • अळणावर-आंबेवाडी (26 कि. मी.)

प्रतिनिधी /बेळगाव

रेल्वेची गती वाढावी व इंधनाची बचत व्हावी, या उद्देशाने भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण केले जात आहे. रेल्वेची गती वाढल्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागात चालू आर्थिक वर्षात 511 कि. मी. मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. मागील वषीच्या तुलनेत यावषी अधिक प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक इंजिनवर धावणाऱया रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई येथे सर्व लोकल रेल्वे या इलेक्ट्रिक इंजिनवर धावतात. या रेल्वे कमी वेळात पुढच्या ठिकाणी पोहोचत असून त्याला डिझेल इंजिनच्या तुलनेत कमी इंधन लागते. याच धर्तीवर देशातील सर्व रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेकडून केला जात आहे. नैर्त्रुत्य रेल्वेकडून बेळगाव विभागातील मिरज ते लोंढा यादरम्यान विद्युतीकरण केले जात आहे. दुपदरीकरणाला जोडूनच विद्युतीकरण केले जात
आहे.

नैर्त्रुत्य रेल्वेने 2020-21 या आर्थिक वर्षात 476 कि. मी. चे विद्युतीकरण केले होते. 2021-22 या चालू आर्थिक वर्षात 459 कि. मी. चे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले होते. परंतु उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 511.7 कि. मी. मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित काम लवकर पूर्ण झाल्यास विजेवर चालणारी रेल्वे या भागातून धावणार आहे.

काही मार्गाचे काम अंतिम टप्प्यात : अनिश हेगडे

इंधनाची बचत व्हावी व रेल्वेची गती वाढावी या दृष्टीने रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. टप्प्याटप्प्याने हे काम सुरू आहे. सध्या काही मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर काही मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

(जनसंपर्क अधिकारी-नैर्त्रुत्य रेल्वे)

Related Stories

ग्राम पंचायत अध्यक्षांच्या घरावर दरोडा

Patil_p

चक्क शाळकरी मुलांनी पोलीस स्थानकात मारली एन्ट्री …

Rohit Salunke

निदर्शनास आलेला बिबटय़ा की केवळ अफवा?

Patil_p

गोकाक रोडशेजारील घरांमध्ये शिरले पाणी

Omkar B

औषध फवारणी करताना खबरदारी घेण्याची गरज

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द ग्रामस्थांच्यावतीने सरकारच्या दडपशाहीचा निषेध

Amit Kulkarni