Tarun Bharat

विद्युत खांबावर चढून वीज कनेक्शन जोडणी : शेतकरी संघटनेची मोहीम

वाकरे / प्रतिनिधी

साबळेवाडी ता करवीर येथे विद्युत खांबावर  चढून शेतकऱ्याने महावितरण कंपनीने तोडलेले वीज कनेक्शन  जोडून कोल्हापूर जिल्ह्यात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने वीज कनेक्शन जोडण्याची  मोहीम सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेती पंपाचे वीज कनेक्शन वीज बिल न भरल्याने बंद केल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील वीज कनेक्शन जोडण्याची मोहीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे . करवीर तालुक्यातील साबळेवाडी येथे शेतकऱ्याचे वीज कनेक्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोडून या मोहीमेची सुरवात केली.

 महावितरणचे अधिकारी निम्मे पैसे भरा मग वीज कनेक्शन जोडून देतो तसेच पैसे नाही भरले तर वीज कनेक्शन जोडून देणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र पुराच्या पाण्यामुळे ऊस पीके वाळून गेली आहेतच पण नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. वीज बील भरण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे .महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत आला आहे.शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्यात वीज कनेक्शन जोडण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याने साबळेवाडी येथील शेतकऱ्यांची शेती पंपाच्या विद्युत मोटरची विज कनेक्शन शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यानी खांबावर चढून वीज कनेक्शन जोडण्याची  मोहीम सुरू केली.

 अध्यक्ष अशोक जाधव यांनी शेतकरी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत असे सांगून आमचे पैसे सरकारकडे आहेत त्यातुन पैसे वसुली करावे अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी शासनाच्या व महावितरणच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील ,सुग्रीव पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष डॉ.डी.एम.पाटील ,संभाजी चौगले, बाबासो फाळके, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सिद्धेश पाटील, अभिजीत जाधव उपस्थित होते.

Related Stories

मुरमावरून मोटारसायकल स्लिप होवून एकाचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : सहकारी संस्था निवडणुकांना सहाव्यांदा ब्रेक

Archana Banage

सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले?; राणेंचा सवाल

datta jadhav

‘उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा’; संदीप देशपांडेंचं ट्विट

Archana Banage

कोल्हापुरात कोरोनाचे १० बळी, ४५२ नवे रुग्ण

Archana Banage

कोट्य़वधी रुपयांचा खर्चाचे तीन पूल बांधूनही पूरपरिस्थिती जैसे थे

Archana Banage