Tarun Bharat

विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा

Advertisements

बेंगळूर

 राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी दोन जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निजदपाठोपाठ भाजपने देखील उमेदवारांची घोषणा केली आहे. आग्नेय पदवीधर मतदारसंघातून चिदानंद गौडा, पश्चिम पदवीधर मतदारसंघातून एस. व्ही. संकनूर यांना उमेदवारी दिली आहे. तर ईशान्य शिक्षक मतदारसंघातून शशिल नमोशी यांना आणि बेंगळूर शिक्षक मतदारसंघातून पुट्टण्णा यांना उमेदवारी घोषित केली आहे. भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव अरुण सिंग यांनी शनिवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील प्रत्येकी दोन अशा एकूण चार जागा जून अखेरीस रिक्त झाल्या होत्या. कोरोना परिस्थितीमुळे तेथे निवडणुका झाल्या नाहीत. दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम व आग्नेय पदवीधर मतदारसंघ तसेच ईशान्य व बेंगळूर शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली होती.

Related Stories

कर्नाटक आरोग्यमंत्र्यांचा खासगी रुग्णालयांना इशारा

Archana Banage

कर्नाटक: भाजप आणि काँग्रेसचे अपयश हा निवडणुकीचा मुद्दा असेलः कुमारस्वामी

Archana Banage

कर्नाटक: ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यू दर सर्वाधिक

Archana Banage

राज्यात लॉकडाऊन की नाईट कर्फ्यू?

Patil_p

कर्नाटक: सीईटी केंद्रे कंटेनमेंट झोन अंतर्गत येऊ नयेत

Archana Banage

केपीएससी एफडीए परीक्षेचा पेपर लीक प्रकरणी आणखी एकास अटक

Archana Banage
error: Content is protected !!