Tarun Bharat

विधानपरिषद निवडणुकीसाठी अनुभवी अधिकाऱयांची नियुक्ती करा

Advertisements

एकरुप कौर यांचा अधिकाऱयांना आदेश

प्रतिनिधी /बेळगाव

विधानसभा व विधान परिषद या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी ही वेगळय़ा धर्तीची असते. तेव्हा विधान परिषद निवडणुकीसाठी अनुभवी अधिकाऱयांची नेमणूक करावी, कोणत्याही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी, असा आदेश जिल्हय़ाच्या विधानपरिषद निवडणूक निरीक्षक आणि आयएएस अधिकारी एकरुप कौर यांनी अधिकाऱयांना दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी नोडल अधिकारी व निवडणूक अधिकाऱयांना ही सूचना केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार प्रत्येकानेच काम करणे गरजेचे आहे. निवडणूक ही मुक्त वातावरणात पार पडली पाहिजे. त्यासाठी अधिकाऱयांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी ही वेगळी असते. त्यामुळे यासाठी अनुभवी अधिकारी नियुक्त करावेत, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी व सर्व अधिकाऱयांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी तयारी करावी. आचारसंहिता भंग होवू नये. याचबरोबर इतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येवू नये. त्यासाठी नोडल अधिकाऱयांनी वरिष्ट अधिकाऱयांकडे माहिती द्यावी. कोणतीही समस्या उद्भवल्यास तातडीने त्याचा सोक्षमोक्ष लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी सांगितले की, निवडणुकीसंदर्भात सर्व तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 511 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निवडणूक कर्मचारी व इतर अधिकाऱयांना प्रशिक्षण आता दिले जात आहे. प्रत्येक बुथसाठी एका अधिकाऱयाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, माहिती व प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरूनाथ कडबुर, बुडा उपायुक्त प्रितम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

एकरुप कौर यांनी कडोली, काकती येथे दिली भेट

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याची पाहणी एकरुप कौर यांनी केली. कडोली आणि काकती येथे भेट देवून त्यांनी बुथची पाहणी केली. दोन्ही ग्राम पंचायतींच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसारच सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, प्रितम नसलापुरे, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, मागासवर्गीय कल्याण विभागाचे अधिकारी गौरीशंकर आदी उपस्थित होते.

Related Stories

शिवसेनेतर्फे नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सन्मान

Amit Kulkarni

बसवणकुडची येथील ट्रस्टच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कोळुचे

Omkar B

रस्त्यावरील धोकादायक विद्युत खांबांचे स्थलांतर करण्याची मागणी

Amit Kulkarni

बिजगर्णी येथे महालक्ष्मी मंदिराचा चौकट पूजन कार्यक्रम उत्साहात

Omkar B

चित्रांमधून ग्रामीण जीवनाचे दर्शन

Amit Kulkarni

आमटे ग्रा. पं. अध्यक्षपदी पार्वती नाईक

Amit Kulkarni
error: Content is protected !!