Tarun Bharat

विधानसभेतही भाजपलाच बहुमत

मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा : पाच पैकी चार पालिकांवर भाजपचे मंडळ भाजपचे 93 पैकी 52 उमेदवार विजयी

प्रतिनिधी / पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी 5 पालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून 5 पैकी 4 पालिकांवर भाजपचे मंडळ स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. शिवाय गोव्यातील पालिका निवडणुकीचा निकाल पाहता 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळवून सरकार स्थापन करणार असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

पणजीत भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गोव्यातील जनता – मतदार हे प्रत्येक निवडणुकीत भाजपला विजयी करीत असून तोच कल आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. जनता भाजपच्या मागे उभी असल्याचीच ही पोचपावती असून विरोधकांनी भाजपच्या विरोधात कितीही अपप्रचार केला तरी त्यात मतदार – जनता बळी पडत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. विरोधकांनी याची दखल घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

विजयी मिरवणुका काढणार नाहीत

भाजपचे 93 पैकी 52 उमेदवार विजयी झाले असून काहीजण किरकोळ मतांनी पराभूत झाले आहेत. विजयाच्या आनंदात कोणत्याही उमेदवाराने किंवा भाजपतर्फे मिरवणूक काढू नये असे ठरवल्याची माहिती डॉ. सावंत दिली. पालिकांनी ‘स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर भारत’ या करीता प्रयत्न करावेत कारण पालिका या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांना 15 व्या वित्त आयोगाचे तसेच गोवा सरकारच्या 60 व्या मुक्तीदिनाचे मोठय़ा रक्कमेचे अनुदान मिळार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

जनतेचे आभार

भाजप पुरस्कृत उमेदवारांना विजयी केल्याबद्दल त्यांनी व तानावडे यांनी जनतेचे आभार मानले. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी अनुक्रमे वास्को, केपे व सांगेतील जनतेचे आभार मानून तेथील विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

गोमेकॉत 150 बेडचे कोविड हॉस्पिटल

Amit Kulkarni

वास्कोत आज हैदराबाद एफसीची लढत ओडिशाशी

Amit Kulkarni

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सर्वच अडचणीत

Omkar B

कोरोनाच्या सावटातही मडगावात 64 टक्के मतदान

Amit Kulkarni

वाहतूक कंत्राट कायम करण्यास अखेर ‘एनक्यूब’ कंपनी तयार

Patil_p

दिव्यांगासाठी जानेवारीत ‘पर्पल महोत्सव’

Amit Kulkarni