Tarun Bharat

विधानसभेला मोठ्या पक्षांसोबत युती नाही : अखिलेश यादव

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तरप्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही, असा निर्णय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घेतला आहे. 

पत्रकारांशी संवाद साधताना अखिलेश म्हणाले, उत्तरप्रदेशात 2022 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सपा कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती न करता छोट्या पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढेल. 

शिवपाल यादव हे घरवापसी करतील, असे संकेतही अखिलेश यांनी दिले. शिवपाल यांच्यासाठी समाजवादी पक्ष इटावामधील जसवंतनगरचा मतदारसंघ सोडेल. तसेच आपले सरकार सत्तेत आल्यास त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवपाल यादव हे अखिलेश यादव यांचे काका असून, त्यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून प्रगतिशील समाजवादी पक्षाची (प्रसप) स्थापना केली आहे. या पक्षाला सामावून घेण्याची तयारी सपाने दर्शवली आहे.

Related Stories

बहुतांश शेतकरी संघटनांचा कृषी कायद्यांना होता पाठिंबा

Patil_p

देशात कोरोनाबळींचा नवा उच्चांक

datta jadhav

कार-कंटेनरच्या भीषण अपघातात 5 ठार

datta jadhav

दिल्लीत दिवसभरात 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

Tousif Mujawar

पाँडिचेरीत आणखी दोन आमदारांचा राजीनामा

Patil_p

भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

datta jadhav