Tarun Bharat

विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून

सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांकडून तयारी

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार दि. 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनात पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ, बेरोजगारी, वाढती महागाई, कोरोना लसींची कमतरता, कायदा-सुव्यवस्था यासह विविध मुद्दय़ांवरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजप नेते सज्ज झाले आहेत.

बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी हे पहिलेच अधिवेशन आहे. एकूण 10 दिवस चालणाऱया या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ, कोरोना नियंत्रणात अपयश यास अनेक मुद्दय़ांवरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठविण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी केली आहे. त्यामुळे कामकाजावेळी गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

म्हैसूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरूनही विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात 14 विधेयके आणि 4 अध्यादेश मांडून संमत केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गावठी दारू, अमली पदार्थ गुन्हेगार, जुगावर व इतर गुन्हय़ांचे व्हिडीओ-ऑडियो चोरी प्रतिबंधक विधेयक, दंड प्रक्रिया संहिता दुरुस्ती विधेयक, कर्नाटक कारागृह विकास मंडळ विधेयक, कर्नाटक स्टँप दुरुस्ती विधेयक, कर्नाटक पालिका आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक, कर्नाटक लोकायुक्त दुरुस्ती विधेयक तसेच कर्नाटक राज्य नागरी सेवा (शिक्षक बदल्या नियंत्रण) अध्यादेश, कर्नाटक शहर-ग्रामीण योजना अध्यादेश यांचा समावेश आहे.

सोमवारी सायंकाळी भाजप विधिमंडळाची बैठक

अधिवेशनातील विरोधी पक्षांच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये ही सायंकाळी 6.30 वाजता ही बैठक होणार असून सर्व आमदार, विधानपरिषद सदस्य आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

Related Stories

प्रदूषण हटले… हिमालय दिसला

Patil_p

नव्या रुग्णांमध्ये केरळचेच 51 टक्के

Amit Kulkarni

लडाखमध्ये ‘डार्क स्काय रिझर्व्ह’ची निर्मिती

Patil_p

पंजाबमध्ये आज ‘मत’संग्राम

Patil_p

हायकमांडने सूचना दिल्यास राजीनामा

Amit Kulkarni

पुढील निवडणुकांसाठी भाजपची पूर्वतयारी

Patil_p