Tarun Bharat

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) मुंबईत सुरू होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

शेतकरी कर्जमाफी, सातव्या वेतन आयोगामुळे तिजोरीवरील ताण, विविध योजना आणि सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी लागणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक तजविज यासारख्या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसेच फडणवीस सरकारच्या काळातील काही कथित घोटाळे, त्याचे अहवाल समोर आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्यावरील आरोपांचाही समावेश आहे.

अधिवेशनच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहांचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि ज्ये÷ आमदारांना चहापान व चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहात आमंत्रित केले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात सलून सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी

Rohan_P

मनसेची मातोश्री समोर पोस्टरबाजी

prashant_c

KOLHAPUR; महापुरात सगळंच वाहून जातं, झाडे जाती, तिथं लव्हाळे वाचती, शिंदे गटाला पेडणेकरांचा टोला

Rahul Gadkar

पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन करा ; मुंबई हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांना सूचना

Abhijeet Shinde

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Rohan_P

माझ्या विरोधात दाखल केलेली तक्रार खोटी : अझरूद्दीन

prashant_c
error: Content is protected !!