Tarun Bharat

विधीमंडळाबाहेर भाजपने भरवली प्रति विधानसभा ; फडणवीसांनी मांडला आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपच्या १२ आमदारांचे सदस्यत्व एक वर्षांसाठी निलंबित करण्याचा ठराव संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर झाला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता.त्यानंतर, भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या भाजपने आज आंदोलन सुरू केलं आहे. सुरूवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केलं. त्यानंतर सभागृहाबाहेरचं भाजपने प्रतिविधानसभा भरवली. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत सरकारच्या विरोधात धिक्कार प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी हा प्रस्ताव मांडला. प्रतिविधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी, एमपीएससी, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला, तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय.जे घडलंच नाही ते घडलं आहे, असं सांगून धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून आमदारांना निलंबित केलं जातं म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतो आहे, असं फडणवीस म्हणाले.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात २४ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा

Abhijeet Shinde

खडसेंना 3 तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी भेट नाकारली

datta jadhav

शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका- संजय राऊत

Abhijeet Shinde

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार : २९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Abhijeet Shinde

रिक्षा चालकास लुटणारा जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!