Tarun Bharat

विनय कोरे करिअर अकॅडमी तात्यासाहेब कोरे चषकाचे मानकरी

Advertisements

वारणानगर/ प्रतिनिधी

येथील वारणा युवक संघटना, वारणा सह बँक व मनुग्राफ इंडिया, कोडोली यांच्या वतीने आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे चषक सामान्यज्ञान स्पर्धेत विनय कोरे करिअर अकॅडमी वारणानगरने सांघिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. कोरे अकॅडमीने सलग दुसऱ्या वर्षी तात्यासाहेब कोरे चषकावर आपले नाव कोरले आहे.

वैयक्तिक लेखी परीक्षेत मुलामध्ये हरी शिंदे, मुलींमध्ये शिवानी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावले. वारणानगर ता. पन्हाळा येथील शेतकरी भवन येथील तात्यासाहेब कोरे सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन विलासराव कोरे कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचा निकाल सामान्यज्ञान स्पर्धा सांघिक गट विनय कोरे करियर अकॅडमी (प्रथम), नालंदा अभ्यास केंद्र मांगरुळ जि.सांगली (व्दितीय), लक्ष फौंडेशन -.वारणानगर (तृतीय).

वैयक्तिक लेखी परीक्षा : हरिष शिदे – (बहिरेवाडी), शुभम वरेकर (वारणानगर), निखिल वरेकर, (देववाडी), मिलिंद पाटील (मांगरुळ), अतुल आरके (वारणानगर), अभिजित कुंभार (वारणानगर) यानी तर मुलीमध्ये शिवानी जाधव (बहिरेवाडी), सोनाली पाटील (वारणानगर),जीवन पायमल (आरळे) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.

कोल्हापूरच्या राज्य कर उपायुक्त वैशाली काशिद, सांगलीचे प्रादेशीक परिवहन अधिकारी विष्णू चव्हाण, उत्पादन शुल्कचे पोलीस उपनिरीक्षक एन.एल.पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

या स्पर्धेत सांघिक गटात २६ संघानी तर वैयक्तिक लेखी परीक्षेत १२५ विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाल्याचे प्रा. के.जी. जाधव यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी डॉ. एस. एस.खोत, डॉ. डी. डी. सातपूते, डॉ.एस.जी. जांभळे, डॉ. सी.आर. जाधव, प्रा. यु. आर.पाटील, लखन करे, उदय पाटील व सहकारी युवा कार्यकत्यांनी परीश्रम घेतले. प्रा. एस.आर. कुलकर्णी यांनी आभार तर राजेंद्र पाटील यांनी सूत्र संचालन केले.

Related Stories

नागदेववाडी पेयजल योजना भ्रष्टाचार सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

Archana Banage

पिंपळगाव खुर्दमध्ये मुश्रीफ गटाची सत्ता; सरपंचपदी शीतल नवाळे विराजमान

Archana Banage

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावर श्वेतपत्रिका काढा

Archana Banage

पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : रंकाळावेस तालीम आणि के. आर.अण्णा यांच्यातील नात खंडीत

Archana Banage

FIFA विश्वचषक 2022 : जपानचा जर्मनीला धक्का; 2-1 ने विजय

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!