Tarun Bharat

विनाअनुदानित सिलिंडर 19 रुपयांनी महागला

Advertisements

गेल्या पाच महिन्यात 139.50 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गॅस सिलिंडरदर महागल्याने ग्राहकांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका सहन करावा लागला. सलग पाचव्या महिन्यात सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांच्या काळात विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 139.50 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, गॅस सिलिंडरबरोबरच विमान-जेटच्या इंधन दरातही 2.6 टक्क्यांनी वाढ झाल्याने हवाई प्रवास महागण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर 19.50 रुपयांनी महागला आहे. 14.2 किलो गॅस सिलिंडरचा दर मुंबईत ग्राहकांना गॅससाठी 684.50 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत हाच दर 714 रुपये इतका झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. या दरवाढीने व्यावसायिकांनाही दरवाढीचा फटका बसेल. सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडरवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजारभावाप्रमाणे खरेदी करावा लागतो.

Related Stories

एअरटेलच्या मोबाइल ग्राहकांमध्ये घट

Patil_p

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 हजार CRPF जवान

datta jadhav

लॉकडाऊनमध्ये मासेमारीला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c

औषधांच्या काळाबाजारावर राज्यांनी कठोर कारवाई करावी

Patil_p

पंजाबमध्ये एका दिवसात 1,793 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

वरिष्ठ नेते कमलनाथ यांना राहुल गांधींनी फटकारले

Patil_p
error: Content is protected !!