Tarun Bharat

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

सातारा : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकार राहील, असे कळविले असताना देखील बरेचसे नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलीस विभाग, संबंधित नगर पालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

Related Stories

सातारा : धावडी येथे ५ गवे विहिरीत पडले; एका गव्याचा मृत्यू

Archana Banage

सातारा : कोरोनामुळे मोदक खरेदीला भक्तांचा अल्प प्रतिसाद

Archana Banage

जिह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

Patil_p

दोन बसच्यामध्ये वाहक सापडून गंभीर जखमी

Patil_p

युट्युबवरील त्या व्हिडिओप्रकरणी अंनिसने पोलिसांत केली तक्रार

Archana Banage

आंतरराज्य दुचाकी चोर गजाआड

Patil_p