Tarun Bharat

विनापरवानगी पाणी प्यायल्याने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पटना

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात विनापरवानगी पाणी पिल्याने केलेल्या मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे. बिहार मधील वैशाली जिल्ह्यातील सालेमपूर गावात. मृत व्यक्तीने तहान लागल्याने हातपंपाचे पाणी प्यायल्याच्या शुल्लक कारणावरुन आरोपीने वृद्धाला जबरी मारहाण केली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

पीडित वृद्धाचा मुलगा रमेश सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार वडील गुरांसाठी गवत आणण्यासाठी गेले असता त्यांना तहान लागली. यावेळी त्यांनी हातपंपावर जात विनापरवानगीशिवीय पाणी प्यायले. याचा राग हातपंम्प मालकाला आल्य़ाने त्यांनी पाणी पिणाऱ्या वृद्धास मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती कि यात वृद्धाचा मृत्यू झाला.

पीडित वृद्धाचा मुलगा रमेश सैनी यांनी एएनआयला सांगितले की, आरोपी बापलेकांनी माझ्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. आमचे हँडपम्प मालकाशी कोणतेही वैर नव्हते.”“मृताला त्याच्याच जातीतील काही लोकांनी मारहाण केली होती. यामध्येच ६ नोव्हेंबरच्या पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असे उपविभागीय पोलीस अधिकारी राघव दयाळ यांनी सांगितले.

Related Stories

महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता

prashant_c

शिंदे गटाला भाजप प्रवेशच करावा लागेल?

Patil_p

२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही – जयंत पाटील

Archana Banage

ममता बॅनर्जी अपघातावरून राजकारण जोरात

Patil_p

मारुती सुझुकी बलेनो, एक्सएल 6 सीएनजीमध्ये लाँच

Patil_p

तृणमूल नेता साकेत गोखलेला अटक

Patil_p