Tarun Bharat

विनापरवाना फलक प्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवरच गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी/ कराड

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील विजयी पॅनेलच्या अभिनंदन करणारा फलक सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावल्याप्रकरणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर सोमवारी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान नगराध्यक्षांच्या पतीवरच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी विना परवाना फलक प्रकरणी पालिकेकडे तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 2 जुलै रोजी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांना शहरात पाहणी करून विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिलिंद शिंदे हे दोन कर्मचाऱयांच्यासह शहरात पाहणी करत होते. त्यांना शाहू चौकात रस्त्याकडेला, बनपूरकर कॉलनी परिसरात सहकार पॅनेलच्या विजयाचा 8 ते 10 फूट विनापरवाना फलक दिसला. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आनंदराव शिंदे यांनी तो फलक लावल्याचे दिसून आले. त्यामुळे शिंदे यांना विनापरवाना फलक लावल्याबद्दल नोटीस बजावली होती. मात्र आजपर्यंत त्याचा खुलासा केला नाही. दरम्यानच्या काळात हे फलक काढण्यात आले आहेत. मात्र पाहणीवेळी त्याचे फोटो घेतले आहेत. या फलकाला पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे उमेश शिंदे यांच्याविरूद्ध सार्वजनिक ठिकाणी विद्रुपीकरण केल्याने महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती पाहता निर्बंध मे महिन्यापर्यंत वाढवण्याची शक्यता- राजेश टोपे

Abhijeet Shinde

नुसता जांगडगुत्ता

datta jadhav

कचरागाडीची जीपीएस तपासणी होणार

Patil_p

शिवसेना भवनसमोर राडा : भाजपला योग्यवेळी उत्तर देऊ – अनिल परब

Abhijeet Shinde

जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जेष्ठांचा सन्मान

Patil_p
error: Content is protected !!