Tarun Bharat

विनापरवाना बांधकामाच्या निषेधार्थ उचगावमध्ये सोमवारी आंदोलन


उचगांव /वार्ताहर

उचगाव, वळीवडे व गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील विनापरवाना बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्याने सोमवारी (दि.५) उचगाव हद्दीतील कुठ्या मंदिरनजीक कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रातिनिधिक होळी करण्यात येणार आहे. या होळी आंदोलनाचा इशारा दलित महासंघाच्या वतीने गांधिनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी दिला. तसे निवेदन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

उचगावसह गडमुडशिंगी व वळीवडे परिसरात विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांना उत आला आहे. याबाबत अनेक सामाजिक व आरटीआय कार्यकर्त्यांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वास्तविक न्यायालयीन आदेशाचा भंग करून ही बांधकामे होत आहेत. तरीसुद्धा आपले प्रशासन मुग गिळून गप्प आहे. दलित महासंघाच्या वतीनेही आपल्याकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या आहेत. विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम सुरु केल्याबद्दल आमच्या महासंघाच्यावतीने आपल्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे. मात्र अद्याप त्याच्यावर कारवाई झालेली नाही. म्हणून सोमवारी प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची होळी आंदोलन उचगाव हद्दीतील कुठ्या मंदिर परिसरात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

Related Stories

Kolhapur; मिणचेत झाडाची फांदी पडून मोटारसायकलस्वार ठार, दोघे जखमी

Abhijeet Khandekar

कुपवाडच्या उमेद टेक्सटाईलची साडेनऊ लाखांची फसवणूक

Archana Banage

संघर्षालाही मर्यादा असावी; पवारांनी दसरा मेळाव्यावरुन टोचले दोन्ही गटाचे कान

datta jadhav

विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार

Archana Banage

दुसाळेचा जवान लेहमध्ये हुतात्मा

Patil_p