Tarun Bharat

विनापरवाना मुरूम वापरल्याने 3 कोटी 4 लाखाचा दंड

Advertisements

करमाळा : प्रतिनिधी

डिकसळ ता. इंदापुर ते कोंढार चिंचोली ता.करमाळा या जुन्या रेल्वे लाईन वरील रस्त्याच्या कामात विनापरवाना मुरूम व दगड वापरल्याबद्दल पुणे येथील ठेकेदार मे.शेळके कंस्ट्रक्शन कंपनी (ठेकेदार बबन शेळके) यांना तब्बल ३ कोटी ४ लाख रुपये दंड करमाळा तहसीलदार समीर माने यांनी ठोठावला आहे. एवढा दंड होण्याची ही अलीकडील काळातील पहिलीच घटना आहे.

या प्रकरणी कोंढार चिंचोली येथील माजी सरपंच देविदास सांळुके व राम जयवंत पाडुळे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे तक्रारी दाखल करून चार वर्षापासून पाठपुरावा केला होता. सदर प्रकरणी तहसीलदार करमाळा यांनी पाच सुनावन्या घेऊन ठेकेदार शेळके कन्स्ट्रक्शन कंपनी यांना खनिज साहित्य रक्कम रू ६०,८४,०००/चे पाचपट ३ कोटी ४ लाख २हजार रुपये दंड ठोठावला आहे. या रस्त्याचे काम सन २०१० -२०११-२०१२ मध्ये झालेले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार क्षेत्रात २ फुटापेक्षा जास्त खोदाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे.

तशी परवानगी सदर ठेकेदार शेळके यांनी घेतली नसल्याने ५ पट दंडाची आकारणी करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केलेली आहे. याबाबत श्री. साळुंके म्हणाले की, या कामी आम्ही गेली पाच वर्षापासून कायदेशीर संघर्ष करीत होतो त्यास यश आलेले आहे. भविष्यात तालुक्यात व इतर ठिकाणी अशा स्वरूपाचे अवैध उत्खनन झाल्यास आवाज उठवणार आहोत.

Related Stories

मुंबईतील अंधेरी भागात बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत कोसळली; ५ जण जखमी

Abhijeet Shinde

कोरोनाच्या ‘डेल्टाक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध

datta jadhav

मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde

काश्मिरी पंडितांच्या संरक्षणासाठी माजी सैनिकांचे विशेष दल तयार करा : स्वामी

Abhijeet Shinde

सोलापूर शहर युवक राष्ट्रवादीचे “दुचाकी ढकलो” आंदोलन

Abhijeet Shinde

उत्तराखंड : देशातील भाविकांसाठी चारधाम यात्रा सुरू

Rohan_P
error: Content is protected !!