Tarun Bharat

विनेश फोगटचे कुस्ती क्षेत्रातील पुनरागमन अनिश्चित

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशजनक कामगिरीनंतर भारताची महिला मल्ल विनेश फोगटचे कुस्ती क्षेत्रातील पुनरागमन अनिश्चित असल्याचे समजते. 26 वषीय विनेश फोगटला 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापत झाली होती.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगटने महिलांच्या 53 किलो फ्रिस्टाईल गटात आपला सहभाग दर्शविला होता. बेलारुसच्या व्हॅनेसाने फोगटला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतात तिचे आगमन झाले. दरम्यान, तिच्यावर अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने बेशिस्त वर्तनाचा आरोप ठेवला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्यांचे संपूर्ण देशामध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. विविध राज्यांमध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित केला जात असताना विनेश फोगटकडे थोडे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ती चांगली कामगिरी करू शकली नव्हती. यानंतर तिने तब्बल पाच वर्षे खडतर सराव करत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला. पण पुन्हा तिच्या पदरी निराशाच पडली. कुस्ती क्षेत्रामध्ये विनेश फोगटचे पुनरागमन अनिश्चित असल्याचे बोलले जाते.

Related Stories

श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाडला संधी शक्य

Patil_p

टी-20 विश्वचषकाबाबत आज आयसीसीची बैठक

Amit Kulkarni

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

सिंधू हरली, सोनेरी स्वप्न भंगले

Patil_p

रवि दाहियाला सुवर्ण, दीपक पुनिया अंतिम फेरीत

Patil_p

लिव्हिंगस्टोनच्या करारात वाढ

Patil_p
error: Content is protected !!