Tarun Bharat

विनोद राय यांनी मागितली बिनशर्त माफी

मुंबई / प्रतिनिधी

मानहानीच्या प्रकरणात माजी कॅग विनोद राय (Vinod Rai) यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची बिनशर्त माफी मागितली आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan sing) यांना 2G स्पेक्ट्रम (2G Spectrum)अहवालातून बाहेर ठेवण्यासाठी निरुपम आणि इतर खासदारांनी त्यांच्यावर दबाव आणला होता, असा दावा त्यांनी 2014 मध्ये एका मुलाखतीदरम्यान केला होता.

भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची बिनशर्त माफी मागितली आहे,संजय निरुपम यांनी 2014 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव वगळण्यास सांगितले होते असे वक्तव्य केले होते. वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात संजय निरुपम यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.

राय यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट मनुश्री यांच्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माफी मागितली असून ज्यात त्यांनी निरुपम यांच्या विरोधात केलेल्या टिप्पण्या “वास्तविकपणे चुकीच्या” असल्याचे म्हटले आहे. माफीनाम्यानंतर न्यायालयाने आता प्रकरण निकाली काढले आहे.

Related Stories

कोरोना नियमांचे उल्लंघन; सपाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा

datta jadhav

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन

Archana Banage

सोलापूर :पेनूरच्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू , कोरोनाचा सातवा बळी

Archana Banage

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार

Archana Banage

Video : घोड्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

Archana Banage

”भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्लीला पाठवू नये”

Archana Banage