Tarun Bharat

‘विन्यासा’ फॅशन शो रंगतदार

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

केएलई फॅशन टेक्नॉलॉजी ऍन्ड ऍपॅरल डिझाईन वूमन्स कॉलेजतर्फे ‘विन्यासा’ हा फॅशन शो नुकताच पार पडला. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध पोषाखांचे त्यांनी रॅम्पवॉकद्वारे सादरीकरण करून फॅशन शो रंगतदार केला.

प्रमुख पाहुण्या म्हणून मिस वर्ल्ड सुपर मॉडेल एशिया-2019 स्नेहल बिर्जे तसेच आलोकी बुटीकच्या अरुणा मत्तीकोप्प व श्रीदेवी काळे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या वेदश्री के. उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना स्नेहल म्हणाल्या, मॉडेलिंग म्हणजे सुंदर दिसण्यासाठी असते, असा समज आहे. परंतु हे वास्तव नव्हे. या क्षेत्रातसुद्धा अथक परिश्रम करावे लागतात. या उद्योग विश्वाची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेला तोंड देण्याची तयारी असायला हवी. सौंदर्य केवळ बाह्य सौंदर्य नसते तर अंतर्मनाचे सौंदर्यसुद्धा येथे विचारात घेतले जाते. तुम्ही अनुकरण न करता स्वतःचा ठसा उमटवा, असेही त्या म्हणाल्या.

यानंतर विद्यार्थिनींनी फॅशन शो सादर केले. ‘मंथन’ या स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. फॅशन शोचे परीक्षण स्नेहल बिर्जे, अरुणा मत्तीकोप्प आणि श्रीदेवी काळे या पाहुण्यांनी केले. अंतिम वर्षाच्या एकूण तीस विद्यार्थिनींनी विविध थिमनुसार पोषाखांचे सादरीकरण केले. विद्यापीठाच्या प्रथम क्रमांक विजेत्या श्रुती मुरली यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अरुणा मत्तीकोप्प आणि श्रीदेवी काळे यांनी गार्मेंट इंडस्ट्रीबद्दल माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Related Stories

हळद लागली मात्र अक्षता थांबल्या…!

Omkar B

कृष्णा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

Amit Kulkarni

बेळगावमधून धावणाऱया रेल्वेंचे वेळापत्रक

Amit Kulkarni

बळ्ळारी नाल्यातील बांध हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

कोल्ड्रिंक्स चालकांनाही आर्थिक मदत करा

Patil_p

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!