दोहय़ाहून बँकॉक येथे जात असलेल्या एका विमानाचे मंगळवारी सकाळी कोलकाता येथील डमडम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करविण्यात आले. कतार एअरवेजच्या या विमानातील एका प्रवासी महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. या महिलेने विमानातच एका मुलाला जन्म दिला आहे. विमान भारतीय हवाईहद्दीत असताना ही घटना घडली आहे.


previous post