Tarun Bharat

विमानाने 363 किलो व्हॅक्सिन दाखल

बेळगावमधून उत्तर कर्नाटकाला वितरण

प्रतिनिधी /बेळगाव

व्हॅक्सिनची आवश्यकता सर्वत्रच भासत आहे. त्यामुळे व्हॅक्सिन तयार झाल्यापासून लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचेल, याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. बेळगावमध्ये विमानाने आतापर्यंत 363 किलो व्हॅक्सिन आली आहे. अवघ्या तासाभरात व्हॅक्सिन सुरक्षितरित्या पुण्यातून बेळगावमध्ये पोहोचत आहे.

पुणे येथून दररोज बेळगावला विमानाची सोय आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाशी संलग्न कंपनी पुणे-बेळगाव-पुणे अशी सेवा देते. त्यामुळे अवघ्या तासाभरात बेळगाव-पुणे असा प्रवास करता येतो. कोविशिल्ड व्हॅक्सिन पुणे येथे तयार होते. पुणे येथून संपूर्ण भारतभर व्हॅक्सिन पाठविली जाते. सुरुवातीच्या काळात पुणे येथून वाहनाने बेळगावला व्हॅक्सिन दाखल झाली. परंतु त्यानंतरच्या काळात विमानाद्वारे व्हॅक्सिनची वाहतूक सुरू झाली.

ऑगस्टपासून बेळगाव विमानतळावरून कार्गोचीही सेवा देण्यात येत आहे. व्हॅक्सिनच्या वाहतुकीमुळे कार्गो सेवेलाही बळ मिळाले आहे. बुधवार दि. 22 रोजी 11 बॉक्समधून 1 लाख 22 हजार 760 डोस विमानाने बेळगाव विमानतळावर दाखल झाले. बेळगाव येथे व्हॅक्सिनचे मुख्य केंद असून येथून उत्तर कर्नाटकाला व्हॅक्सिन पाठविली जाते. यामुळे दररोज मोठय़ा प्रमाणात बेळगावमध्ये व्हॅक्सिन दाखल होत आहेत. आतापर्यंत 363 किलो इतक्मया वजनाच्या व्हॅक्सिन विमानतळावर आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

मजगाव येथे महिला जागृती कार्यक्रम

Amit Kulkarni

सर्जा-राजाचे संवर्धन काळाची गरज

Amit Kulkarni

रविवारी पावसाने दिली उसंत

Omkar B

टीडब्ल्यूएस बॅडमिंटन स्पर्धेत नताशा कनगुटकर विजेती

Amit Kulkarni

झुंजवाड येथे ट्रक्टरखाली सापडून शेतकऱयाचा मृत्यू

Amit Kulkarni

कणकुंबीची नाटय़कला पोहोचली मुंबई रंगमंचावर

Amit Kulkarni