Tarun Bharat

विमान कंपन्यांकडून 31 मे पर्यंत भाडेवाढ नाही!

Advertisements

सिव्हील एव्हिएशन मंत्रालयाकडून माहिती – कोरोना नियावलीचे पालन करण्याची सक्ती

वृत्तसंस्था/ मुंबई

विमान कंपन्या 31 मे पर्यंत भाडय़ांमध्ये वाढ करु शकणार नाहीत. या अगोदरप्रमाणेच कंपन्यांना भाडे आकारावे लागणार आहे. तसेच अन्य प्रतिबंध लावण्यात येणार असल्याची माहिती सिव्हील एव्हिएशन मंत्रालयाने दिली आहे.

प्रामुख्याने विमान व्यवसाय हा मागच्या वर्षापासूनच कोरोनाच्या अडथळय़ासह प्रवास करत आहे. याच नियमावलीत सध्याच्या हवाई वाहतुकीचा प्रवास राहणार असल्याची माहिती आहे. या अगोदर फेब्रुवारीमध्ये याच प्रकारचा आदेश सादर केला होता. त्यामध्ये भाडय़ासह फ्लाइटची क्षमता 80 टक्के करण्यास विमान कंपन्यांना सांगितले होते. परंतु गेल्या रविवारीच विमान कंपन्यांनी मंत्रालयास ही क्षमता कमी करुन 60 टक्के करण्याची विनंती केली होती.

जानेवारीपासून काहीशी रिकव्हरी

जानेवारी महिन्यापासून तोटय़ाचा प्रवास करणाऱया विमान कंपन्या काही प्रमाणात सावरत होत्या. आता पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागतोय.

लॉकडाऊननंतर पुन्हा विमानसेवा

कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर स्थानिक स्तरावरची विमानसेवा 25 मार्च 2020 नंतर थांबविण्यात आली होती. 25 मे पासून काही नियम व अटीसोबत विमानसेवा सुरू झाली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर, लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर स्थानिक विमानसेवा सुरू झाली होती.

Related Stories

एलआयसीकडून 2.19 कोटी नवीन पॉलीसीज सादर

Patil_p

ग्रामीण प्रादेशिक बँकांना सरकारकडून 670 कोटीचे भांडवल

Omkar B

नोकीया 5.4 बाजारात दाखल

Omkar B

एअरटेलच्या 5-जी नेटवर्कची चाचणी

Patil_p

टेक कंपनीच्या सीईओंच्या वेतनात भरभक्कम वाढ

Amit Kulkarni

गोल्ड स्टॉक एक्सचेंजचा मार्ग मोकळा

Patil_p
error: Content is protected !!