Tarun Bharat

विमान कंपन्यांचे समभाग घसरले

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

मागील काही दिवसांपासून सार्वजनिक वाहतुकीचे मार्ग व वाहतूक पूर्णत: बंद आहे. यामध्ये रेल्वे आणि विमान सेवा यांचा वाटा मोलाचा आहे. यात लॉकडाऊन समाप्त होण्याअगोदरच रेल्वे विमानांची तिकीटे बुकिंग करण्यासंदर्भात उलटसुलट बातम्या येत होत्या. परंतु रविवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने आगामी 3 मेपर्यंत कोणत्याही प्रकारचे तिकीट बुकिंग करण्यात येणार नसल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा परिणाम मात्र सोमवारी भारतीय शेअर बाजारामधील विमान कंपन्यांच्या समभागावर झाला आहे. सोमवारी 5.5 टक्क्मयांनी या कंपन्याचे समभाग घसरले आहेत.

दिग्गज कंपन्यांमध्ये इंटरलोब एव्हिएशनचे समभाग 5.47 टक्क्मयांनी घसरुन 1,0110.65 रुपयांवर पोहोचले आहेत. स्पाईसजेटचे समभाग 2.77 टक्क्मयांनी घसरुन 47.25 रुपये भावावर स्थिरावले आहेत. विमान कंपन्यांचे तिकीट बुकिंग रद्द केल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकृत सूचनेनंतर निर्णय घ्या

विमान वाहतुकीसंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आल्यावरच संबंधीत विमान कंपन्यांनी विमानांची तिकीटे बुकिंग करण्यासाठी सूचना सादर कराव्यात, असे आवाहनही नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून यावेळी करण्यात आले आहे.

Related Stories

टोयोटा उत्पादनात करणार घट

Patil_p

एनटीपीसी-ओएनजीसी यांच्यात करार

Patil_p

पेटीएम आयपीओवर आले संकट ?

Patil_p

एसबीआय कार्ड्स आयपीओला प्रारंभ

tarunbharat

दूरसंचार ग्राहकांची संख्या घटली

Patil_p

एचडीएफसीचा निव्वळ नफा घटला

Patil_p
error: Content is protected !!