Tarun Bharat

विमान दुर्घटनेत बेळगावच्या वैमानिकाला वीरमरण

प्रतिनिधी/ बेळगाव

मुरैना, मध्यप्रदेश येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बेळगावच्या जवानाला वीरमरण आले. गणेशपूर येथील विंग कमांडर हणमंतराव रेवणसिद्दप्पा सारथी या वैमानिकाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मध्यप्रदेश येथील मुरैना येथे सरावादरम्यान हे विमान कोसळल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 व मिराज-2000 ही दोन विमाने शनिवारी सकाळी सरावादरम्यान कोसळली. एक विमान मोरैना येथे कोसळले तर दुसरे राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले. ग्वाल्हेर येथील एअरबेसवरून ही विमाने सरावासाठी निघाली होती. परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने विमाने कोसळली. यामध्ये दोन पायलट जखमी झाले तर एका पायलटचा मृत्यू झाला आहे.

हणमंतराव सारथी यांचे संपूर्ण कुटुंबच भारतीय सैन्य व वायुदलात आहे. त्यांचे वडिल रेवणसिद्दप्पा हे भारतीय सैन्यातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ रवी सारथी हे एअरफोर्समध्ये वैमानिक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव रविवारी विशेष विमानाने बेळगावला आणले जाणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Related Stories

स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये राज्याभिषेक सोहळय़ाच्या फ्रेम चे उद्घाटन

Patil_p

केवळ सहा दिवसांतच खुनाचा छडा

Amit Kulkarni

बेवारस कारचे करण्यात आले स्क्रॅप

Amit Kulkarni

श्री बसवेश्वर मल्टिपर्पज सौहार्दच्या चेअरमनवर कारवाई करा

Patil_p

जीवनविद्या मिशनतर्फे महिलांशी संवाद

Amit Kulkarni

जलानिधी योजनेंतर्गत नळ जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Patil_p