Tarun Bharat

विमान प्रवाशांना मिळणार बस सुविधा

सांबरा विमानतळाला बससेवा सुरू करण्यासाठी हालचाली

प्रतिनिधी/ बेळगाव

अनलॉकनंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे बाहेर फिरणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसबरोबरच रेल्वे आणि विमानालादेखील प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. याकरिता मध्यवर्ती बसस्थानकातून सांबरा विमानतळाला बससेवा सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. लवकरच बसस्थानक ते विमानतळ बससेवा सुरू होणार आहे.

बसस्थानकातून सांबरा विमानतळाला बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान प्रवाशांना रिक्षा, टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. परिणामी विमानसेवेलाही प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनने बसस्थानक ते विमानतळ अशी बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांच्या संख्येबरोबर विमानांची संख्याही वाढली आहे. वाढत्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानक ते सांबरा विमानतळ अशी बससेवा सुरू केली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून असलेली प्रवाशांची बससेवेची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. सांबरा विमानतळावरून बेंगळूर, मुंबई आणि दिल्ली या शहरांना विमानसेवा सुरळीत सुरू झाली आहे. स्पाईस जेट, स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स एअर आदी विमान कंपन्यांकडून सेवा दिली जात आहे. मात्र विमानतळावर बससेवा नसल्याने प्रवाशांना चालत सांबरा बसथांब्यावर यावे लागत आहे. तेथून पुढे खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानकातून विमानतळाला बससेवा पुरवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती.

Related Stories

मध्यवर्ती बस स्थानकाजवळील झाडांचे बुंधे हटवा

Amit Kulkarni

कावळेवाडीचा सुपुत्र विक्रम नाईक ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण

Amit Kulkarni

रक्तदानातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी!

Amit Kulkarni

आदिनाथ-आकाशने आपली निवड ठरविली सार्थ

Patil_p

सोमवारी 1097 कोरोनामुक्त 8 जण दगावले; 389 नवे रुग्ण

Amit Kulkarni

‘त्या’ तान्हुल्यासाठी डॉक्टर ठरले देवदूत

Amit Kulkarni