Tarun Bharat

विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याचा दक्षिण आफ्रिकन अव्वल संघसहकारी एबी डीव्हिलियर्स गुरुवारी आपल्या आयपीएल संघात दाखल झाले. हे दोघेही आता सात दिवस क्वारन्टाईन असणार आहेत. आरसीबीने आपल्या ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली. शिवाय, उभयतांची काही छायाचित्रेही पोस्ट केली. यंदा आरसीबीची आयपीएल मोहीम दि. 9 एप्रिल रोजी विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सविरुद्ध लढतीने सुरु होणार आहे.

आयपीएलला 2008 मध्ये सुरुवात झाली, त्या हंगामापासूनच विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघात समाविष्ट आहे. त्याने सोमवारी पुण्यातील बायो-बबल सोडले होते. जानेवारीच्या अखेरपासून तो सातत्याने बायो-बबलमध्ये राहिला आहे. 37 वर्षीय एबी डीव्हिलियर्स देखील आरसीबीसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो 2011 पासून आरसीबी संघाचे प्रतिनिधीत्व करत आला आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच व युवा जलद गोलंदाज नवदीप सैनी यांनी क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला असून संघाचे एक सराव सत्रही पार पडले आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा भारतावर चार गडय़ांनी विजय

Patil_p

पावसामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत स्पर्धा स्थगित

datta jadhav

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

Patil_p

अक्रमच्या यादीत रिचर्ड्स अव्वल, सचिनला पाचवे स्थान!

Patil_p

लक्ष्य सेन दुसऱया फेरीत

Patil_p

झरीनचा वर्ल्ड चॅम्पियनला धक्का

Amit Kulkarni